आंभोळ येथील मच्छिंद्र चौधरी यांनी रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविली. त्यातच त्यांनी पैठण येथील बंधू अनिल यांचे पंधरा एकराचे माळरान व्यवस्थित केले. या क्षेत्रात ते पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल, या तीन गोष्टी साध्य होतील, या पद्धतीच्या पिकांची निवड ते करत होते. याच वेळी केंद्र सरकारचे अरोमा मिशन सुरू होते. या मिशनच्या माध्यमातून सुगंधी वनस्पतींचा आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात कोणत्या वनस्पती येतील, याचा अभ्यास केला. लखनौ येथून सुरुवातीला जिरेनियम या सुगंधी वनस्पतीची रोपे आणली. त्यांची उगवण क्षमता चांगली असल्याचे दिसून आल्यानंतर सहा एकर क्षेत्रात जिरेनियमची लागवड केली. यानंतर लेमन ग्रास, सिट्रेनाला, वाला या वनस्पतींची लागवड केली. काही ठिकाणी ठिबक सिंचन केले आहे. पाणी व्यवस्थापनासाठी एक-दोन कोटी व वीस लाख लीटर क्षमता असणारी दोन शेततळे उभारली. पावसाळ्यात हे दोन्ही तळे भरून घेतले जातात आणि यासाठी मुळा नदीवरून उपसा सिंचन योजना राबविण्यात आली आहे. या सुगंधी वनस्पतीची लागवड यशस्वी झाल्यानंतर, तेल निर्मिती करण्याचा प्रश्न निर्माण झाला. यावरही मात करत तेल निर्मिती करण्यासाठी स्वतःच्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्लांट उभा केला. याबरोबरच आता जिरेनियमची रोपे हे स्वतः तयार करत आहेत.
.....................
तीन वर्षे मिळते उत्पन्न
या सर्व वनस्पतींपासून तीन वर्षे उत्पन्न मिळते. त्यात दर तीन ते चार महिन्यांनी याची कापणी करावी लागते. एक एकर क्षेत्रात वर्षाला किमान चाळीस टन जिरेनियमचे उत्पादन मिळते, तर एक टनच्या मालापासून एक किलो जिरेनियमचे तेल तयार होते. या तेलाला जागतिक पातळीवर मागणी होत असून, तेलाचा हमीभाव साडेबारा हजार रुपये किलो आहे. म्हणजेच एक एकर क्षेत्रात जिरेनियमपासून वर्षेला खर्च वजा जाता सुमारे तीन ते चार लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
..................
इतर लागवड केलेल्या सुगंधी वनस्पतींच्या तेलांनाही जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. लेमन ग्रासपासून तयार करण्यात आलेले तेल पेस्टिसाइड म्हणून वापर करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीच्या शेतीला फाटा देत ज्याला हमीभाव असेल, अधिक दिवस साठवून ठेवता येईल आणि जागतिक पातळीवर आपले उत्पादन पोहोचेल, विकेल, अशीच पिके शेतकऱ्यांनी घ्यावीत.
- मच्छिंद्र आणि अनिल चौधरी
( २० जिरेनियम )