कोपरगाव : सोमैया महाविद्यालय भूगोल विभाग व संशोधन केंद्रातर्फे नुकताच भूगोल दिन साजरा करण्यात आला. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भूगोल दिनाचा कार्यक्रम हा ऑनलाईन पद्धतीने साजरा केला गेला. या कार्यक्रमांतर्गत एस.बी.पी. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोलापूर येथील भूगोल विभाग प्रमुख डॉ. दीपक देडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास विभागातील ६८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी महाविद्यालयाची माहिती देऊन मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. लीना त्रिभुवन यांनी केले तर प्रा. डॉ. साळुंके यांनी आभार मानले. विभागातील प्रा. आकाश सोनवणे, प्रा. कुणाल शिंदे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.