आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ २ - लोकसहभागातून गावोगाव वाचनालय सुरु करण्याचा उपक्रम सेवक फौंडेशनने हाती घेतला आहे़ या उपक्रमातील पहिले वाचनालय पाथर्डी तालुक्यातील आंबेवाडी येथे नुकतेच सुरु झाले आहे.गावागावातील प्रत्येक तरुणाला वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. त्यातून तरुणांची मस्तकं सुधारली पाहिजे़ अभ्यास वाढला की प्रत्येक स्पर्धेला हे तरुण सक्षमपणे सामोरे जातील, यासाठी प्रत्येक गावात मोफत वाचलनालय असावे, या विचारातून सेवक फौंडेशनचे अमोल राठोड, अमृता दरंदले यांच्यासह अनेक तरुण गावोगाव वाचनालय सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला आंबेवाडीतून सुरु झालेल्या वाचनालयाने पहिले यश आले आहे. या वाचनालयाचे उद्घाटन कोळसा उत्पादक संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रभाकर पवार, सचिव विनायक पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण, मुख्याध्यापिका आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. हे वाचनालय सुरु होण्यासाठी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे, गांधी विचारांचे प्रवर्तक डॉ़ सुगन बरंठ, प्रा. अमोल खाडे, शिवव्याख्याते अफसर शेख, श्वेता भांबरे, राहुल खंडारे, स्नेहा हुंबारे, रोहित खरात यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले, असे अमोल राठोड यांनी सांगितले.वाचनालय चळवळीत सामील होण्याचे आवाहनएक गाव- एक वाचनालय चळवळीत प्रत्येक सहभाग घेता येणार आहे. जुनी किंवा नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके, स्पर्धा परीक्षेची पुस्तके, कथा, कादंबऱ्या, कविता संग्रह, चरित्रग्रंथ, साप्ताहिके, मासिके, प्रवासवर्णने अशी विविध पुस्तके वाचनालयासाठी भेट देऊन या वाचनालय चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन अमोल राठोड यांनी केले आहे. तसेच या वाचनालयासाठी संगणक, पुस्तकांचे कपाट, टेबल, खुर्च्यांची आवश्यकता असते़ या वस्तूही वाचनालयाला भेट देण्याचे आवाहन राठोड यांनी केले आहे.
सेवक फाऊंडेशन सुरु करणार गावोगाव वाचनालय
By admin | Updated: April 2, 2017 18:26 IST