शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

हेल्मेट न घालणा-या सरकारी कर्मचा-यांना अडविणार गेटवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 12:32 IST

नगर शहरासह जिल्ह्यात प्रशासनाने हेल्मेट सक्तीचा विषय गांभीर्याने घेतला आहे. ११ डिसेंबरपासून जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व सहकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचा-यांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे़

अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यात प्रशासनाने हेल्मेट सक्तीचा विषय गांभीर्याने घेतला आहे. ११ डिसेंबरपासून जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व सहकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचा-यांना हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. हेल्मेट न वापरणा-यांवर आरटीओ व पोलिसांचे पथक थेट कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जाऊन कारवाई करणार असल्याचे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आले.या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, वाहतूक निरीक्षक अविनाश मोरे यांच्यासह महापालिका, बाजार समितीचे अधिकारी उपस्थित होते़ यावेळी बोलताना पाटील यांनी सांगितले की, हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची जिल्हाभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ११ तारखेपर्यंत शासकीय अधिकारी, कर्मचा-यांनी हेल्मेट खरेदी करावेत, त्यानंतर आरटीओ व पोलीस पथक सरकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जाऊन तपासणी करणार आहे. हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणा-या कर्मचा-यांवर कारवाई करून याबाबतची तक्रार त्यांच्या विभागाप्रमुखांकडे केली जाणार आहे. शासकीय कर्मचा-यांसह इतरांनाही हेल्मेट सक्ती असून, त्यांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. महाविद्यालय, खासगी क्लासमध्ये मोटारसायकलवरून येणा-या विद्यार्थ्यांनाही हेल्मेट वापराबाबत सूचना देण्यात येणार आहे. क्लासचालकांनी सर्व विद्यार्थ्यांना हेल्मेट वापराबाबत प्रबोधन करण्याबाबतच्या सूचना त्यांना परिवहन विभागाकडून देण्यात येणार आहेत.बाजार समितीत एकेरी वाहतूकयेथील बाजार समितीत होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत येथील वाहतूक एकेरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीच्या प्रवेशद्वारातून गेलेले वाहन परत त्या मार्गे न आणता पाठीमागील रस्त्याने न्यावे लागणार आहे. याबाबत बाजार समिती व्यवस्थापनाला दोन दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.ट्रॅक्टरचे साऊंड काढणारऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरचालक मोठमोठे म्युझिक साऊंड लावून रस्त्याने गाणे वाजवित जातात. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत ध्वनीप्रदूषणाची पातळी पाहून अशा ट्रॅक्टरचालकांचे साऊंड काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोटारसायकलीसोबतच खरेदी करावे लागणार हेल्मेटमोटारसायकलची विक्री करताना त्यासोबत वाहनविक्रेत्यांनी ग्राहकांना हेल्मेट देनेही बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व वाहन शोरूमचालकांना पत्र देण्यात येणार आहे. नवीन मोटारसायकलीची नोंदणी करताना हेल्मेट विकत घेतल्याची पावती दाखविल्याशिवाय नोंदणी केली जाणार नसल्याचे पाटील म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका