शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी तालुक्यात शेतक-यांना लुटणा-या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 17:19 IST

उत्तर नगर जिल्यातील नामांकित कारखान्याच्या ऊसतोडणी टोळीने पैसे घेऊनही व्यवस्थित तोड केली नाही. शेतक-यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर कारखान्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेत कारखान्याच्या अधिका-यांनी राहुरीला येऊन चौकशी केली.

राहुरी : ऊसतोडीपोटी शेतक-यांकडून चार हजार रुपये उकळणा-या तोडणी टोळीचा गुरुवारी राहुरी तालुक्यात पर्दाफाश झाला.उत्तर नगर जिल्यातील नामांकित कारखान्याच्या ऊसतोडणी टोळीने पैसे घेऊनही व्यवस्थित तोड केली नाही. शेतक-यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर कारखान्याकडे तक्रार केली. त्याची दखल घेत कारखान्याच्या अधिका-यांनी राहुरीला येऊन चौकशी केली. तसेच संबंधित शेतक-याला पैसे परत मिळवून देत वादावर पडदा टाकला.पिंपळाच्या मळ्यात संदीप ढवळे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना तोडणीपोटी कामगारांनी चार हजार रुपये मागितले. ढवळे यांच्या वाटेक-यांनी कामगाराच्या मुकादमाला चार हजार रुपये दिल्यानंतरही तोडणी कामगारांनी ऊस अर्धवट तोडून पळ काढला. त्यामुळे ढवळे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवरून कारखान्याच्या अधिका-यांकडे तक्रार नोंदविली. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या पोस्टमुळे खडबडून जागे झालेल्या कारखान्याच्या अधिका-यांनी राहुरी गाठली. मुकादमास बोलावून पैसे घेतल्याची खात्री केली. चौकशीत ऊसतोडणीपोटी चार हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले. अधिका-यांनी मुकादमाकडून पैसे मागवून घेतले. याशिवाय तोडणी टोळीचे काम काढून घेतले़ राहिलेला ऊस काढून देऊ, असे सांगत अधिका-यांनी संगमनेर गाठले.ऊस जास्त झाला, अशी अफवा सोडून साखर कारखान्यांनी कमी भावात शेतक-यांकडून ऊस घेतला़ याशिवाय काही काळासाठी कारखान्यांनी टोळयाही काढून घेतल्या़ त्यामुळे भयभीत झालेल्या शेतक-यांनी शरणागती पत्करली. शेतक-यांच्या मजबुरीचा फायदा घेत ऊसतोडणी कामगारांनी बोकड, दारू व पैसे वसूल करण्यास सुरूवात केली. साखरसम्राटांचे उंबरे झिजविण्याची वेळे शेतक-यांवर आली. त्यातच रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढल्याने पाणी असतानाही उसाचे पीक कसे जगवायचे? असा प्रश्न शेतक-यांपुढे आहे.

बारा कारखान्यांच्या टोळ्या कार्यरत

राहुरी तालुक्यात सध्या स्थानिक राहुरी, प्रसाद शुगरसह संगमनेर, अगस्ती, प्रवरा, संजीवनी, कोळपेवाडी, कोळपेवाडी, अशोकनगर, युटेक, दौंड शुगर, अंबालिका, श्रीगोंदा अशा बारा साखर कारखान्यांच्या टोळया कार्यरत आहेत. राहुरी कारखाना सुरू झाल्यानंतर बाहेरील साखर कारखान्यांना ऊस जाऊ देणार नाही, अशी गर्जना तनपुरे कारखान्याचे सूत्रधार डॉ. सुजय विखे यांनी केली होती. त्यानंतर बाहेरील कारखान्यांनी टोळ्या काढून घेतल्या. अल्प प्रमाणावर टोळ्या कार्यरत राहिल्याने आपला ऊस जाणार का? याबाबत शेतक-यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी