शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी पोलिसांनी पकडली मोटारसायकल चोरांची टोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 18:36 IST

धी मोटारसायकल चोरून न्यायची. नंतर तिच मोटारसायकल तिच्या मालकाकडून पाच ते दहा हजार रूपये उकळून परत करायची अशा पद्धतीने पैसे उकळणारी एक टोळी राहुरी पोलिसांनी पकडली.

राहुरी : आधी मोटारसायकल चोरून न्यायची. नंतर तिच मोटारसायकल तिच्या मालकाकडून पाच ते दहा हजार रूपये उकळून परत करायची अशा पद्धतीने पैसे उकळणारी एक टोळी राहुरी पोलिसांनी पकडली. देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या मदतीने राहुरी पोलिसांनी रविवारी ही टोळी गजाआड केली.तनपुरेवाडीजवळील सुनील सुधाकर गाडे यांची स्प्लेन्डर मोटरसायकल १७ फेब्रुवारीस दुपारी तनपुरे वाडी रस्त्यावरून चोरीस गेली होती. त्यांनी मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेऊनही मोटरसायकल मिळाली नाही. त्यांच्याशी १८ फेब्रुवारीस एका निनावी क्रमांकावरून मोबाईलद्वारे संपर्क साधून तुमची गाडी पाहिजे असेल तर आठ हजार रुपये द्यावे लागतील, नाही तर तुमची गाडी परत मिळणार नाही, असे सांगण्यात आले. पैसे देण्याची तयारी दाखविल्यानंतर गाडेंना पैसे घेऊन देवळाली प्रवरा येथे बोलाविले. गाडे व त्यांच्या मुलाने हा प्रकार नगराध्यक्ष कदम यांना सांगितले. कदम यांनी तात्काळ देवळाली पोलीस चौकीला माहिती दे त्यांचे कार्यकर्ते गाडेंच्या मदतीला पाठविले. सहाय्यक फौजदार अनिल गायकवाड, पोलीस नाईक गणेश फाटक, गौतम लगड, सतीश त्रिभुवन तसेच देवळालीचे नगरसेवक सचिन ढूस, शशिकांत मुसमाडे, मंगेश ढुस, तुषार बो-हाडे, शुभम कदम, अजित मोरे, गणेश ढेरे यांनी सापळा लावला. चोरट्याने गाडे यांना त्यांची मोटरसायकल परत करण्यासाठी पैसे तेथील एका दुकानदारांकडे देण्यास सांगितले. गाडे यांनी पाच हजार रूपये त्या दुकानात दिल्यानंतर तुमची गाडी नगर मनमाड रोड लगतच्या पुठ्ठयाच्या कारखान्याजवळ तुमची मोटारसायकल उभी केल्याचे सांगितले.गाडे यांनी तेथे जाऊन दुचाकी ताब्यात घेतल्यानंतर गाडे यांना पुन्हा मोबाईलवरून आणखी दोन हजार रुपये घेऊन कारखाना परिसरात येण्यास सांगितले. दोन हजार रूपये घेऊन गाडे जाताच सापळा लावून असलेले कार्यकर्ते पोलिसांनी दौलत सुखदेव गायकवाड (रा.राहुरी), भूषण देवदत्त पाटोळे (रा. राहुरी खुर्द) व कैलास पवार (रा. कोंढवड) या तिघांच्या टोळीला पैसे घेताना रंगेहात पकडले.

संपर्क साधण्याचे आवाहन

सुनील गाडे यांच्या फिर्यादीवरूनराहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड तपास करीत आहेत. आरोपींकडून आणखी ब-याच गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे जर कोणाची गाडी पैसे देऊन परत केली असेल, अशांनी राहुरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी