शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

हिवरे बाजारचा गणेशोत्सव यंदा महिलांच्या अधिपत्याखालीच साजरा होणार; लोकमतच्या मोहिमेला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 13:32 IST

पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत निर्णय 

अहमदनगर : आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये यावर्षीचा गणेश उत्सव सर्व घटकातील महिला मंडळ आयोजित करणार  आहेत. हिवरेबाजारच्या सरपंच विमलताई ठाणगे यांनी ही माहिती दिली. 

"लोकमत"ने तिचा गणपती ही मोहीम सुरू केली आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हिवरेबाजार ग्रामसभेने हा निर्णय घेतला आहे.दहा दिवसांचा गणपती उत्सव यावर्षी आदर्श गाव हिवरे बाजारमध्ये सर्व घटकातील महिला मंडळ पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करणार असल्याचे ग्रामसभेत ठरले. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरवात करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पत्नी सत्यभामा उर्फ तापसीबाई  टिळक यांना हा उत्सव अर्पण करण्यात येणार आहे. 

एक गाव एक गणपती या सार्वजनिक गणपती उत्सव उपक्रमाचे हे २८ वे वर्षे आहे. यावर्षी ग्रामपंचायत, हिवरे बाजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, ग्रामविकास तरुण मंडळ, महिला बचत गट, मुंबादेवी सहकारी दुध उत्पादक संस्था या सर्व घटकातील महिला आरतीसाठी सहभागी होणार आहेत. सर्व उपक्रमासाठी ग्रामविकास तरुण मंडळ सहकार्य करणार आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना तसेच ग्रामस्तरीय शासकीय कर्मचारी यांना सपत्नीक आरतीसाठी निमंत्रित केले जाणार आहे. १० दिवस महिला व मुलीसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जाणार असून त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर