शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षाला गणेशाचा साज ; वनविभागाचा पर्यावरण संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 14:22 IST

पाच गावात ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने एका झाडाला गणेशाच्या रूपात साज करण्यात आला आहे. तो पाहण्यासाठी मोठी गर्दी केली जाते आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : तालुक्यातील पाच गावात ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने एका झाडाला गणेशाच्या रूपात साज करण्यात आला आहे. तो पाहण्यासाठी मोठी गर्दी केली जाते आहे. यातून वनविभागाने वृक्ष लागवड व पर्यावरण संतुलन हा संदेश गणेश भक्तांना दिला आहे. कर्जत तालुक्यातील विविध गावात मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत करण्यात आले. यावर्षी गणेशोत्सवात कर्जत तालुक्यातील चिलवडी, तरडगाव, बेरडी, थेटेवाडी, पाटेगाव या पाच गावात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली. कर्जत तालुक्यातील सर्व गावात वाड्यावस्त्यावर गणपती बसविण्यात आले आहेत. मात्र तालुक्यातील फक्त ५१ गणेश मंडळांनी अधिकृत परवाने काढले आहेत. अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या सिध्दटेक येथे गणेश भक्त दर्शनासाठी मोठी गर्दी करीत आहेत. यावर्षी अनेक वर्षानंतर गणपतीत पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी वर्ग समाधानी आहे. कर्जत येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने तालुक्यात वृक्षारोपण करण्याचे अभियान राबविण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल नशिफखान सिंघल यांनी हे अभियान राबविले आहे. कर्जत तालुक्यातील शाळा, विद्यालये, महाविद्यालये, न्यायालयाचा परिसर, वनजमिनी, शासकीय कार्यालयाचा परिसर येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल नशिफखान सिंघल यांच्या संकल्पनेतून कर्जत येथे एका झाडाची सजावट करण्यात आली होती. यामधून वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन याचा संदेश देण्यात आला आहे. सजावट केलेले हे झाड पहाण्यासाठी मोठी गर्दी केली जाते आहे. वृक्षलागवड करण्याचा संकल्प करूनच गणेश भक्त येथून बाहेर पडत आहेत. ..