शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

Ganesh Festival 2018 : उजळले रुप विशाल गणेशाचे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 12:18 IST

शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेशाचे रुप शेंदूर उटीने उजळले आहे. साडेबारा फूट उंच असलेली ही मूर्ती तेजस्वी झाली आहे. गणेश प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला झालेले हे विशाल गणपतीचे दर्शन विलोभनीय आहे.

अहमदनगर : शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेशाचे रुप शेंदूर उटीने उजळले आहे. साडेबारा फूट उंच असलेली ही मूर्ती तेजस्वी झाली आहे. गणेश प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला झालेले हे विशाल गणपतीचे दर्शन विलोभनीय आहे.अहमदनगर शहराचे श्री विशाल गणपती हे ग्रामदैवत. माळीवाडा भागात असलेली ही गणपतीची मूर्ती नावाप्रमाणेच विशाल म्हणजे साडेबारा फूट आहे. पूर्वाभिमुख उजव्या सोंडेच्या गणपतीची बैठक नेहमीपेक्षा वेगळी आहे. मूर्ती विशिष्ट मिश्रणापासून तयार करण्यात आलेली आहे. दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वी या मूर्तीची स्थापना झाल्याचे जाणकार सांगतात. मूर्तीच्या बेंबीवर फणाधारी नाग आहे, तर डोक्यावर पेशवेकालीन पगडी आहे. शुभ्र संगमरवरी दगडातून घडलेले गर्भगृह, त्यावर सुंदर नक्षीकाम यामुळे मंदिराचे रुप मनमोहक झाले आहे. गणेशोत्सवातील मिरवणुकीत पहिला मान या गणपतीला असतो.गणेशाच्या मूर्तीवरील शेंदूराचा जुना लेप काढण्यात आला होता. त्यावेळी २६ महिने मंदिर बंद होते. ते गतवर्षीच्या गणेशोत्सवात उघडले. शुभ्र संगमरवरी दगड, त्यावरील नक्षीकाम आणि त्यावर सोडलेला प्रकाशझोत यामुळे मंदिराचे रुपच पालटले आहे. गणेशाच्या दर्शनासाठी येणारा भाविक प्रसन्न चित्ताने या मंदिरात रमतो. प्रथमच गर्भगृहाला चांदीचे दरवाजे बसविण्यात आले आहेत. चांदीचे मखर बसविण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांनी सांगितले.ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात गणेशोत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. शुक्रवारी (१४ सप्टेंबर) सकाळी सहा वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठण होणार आहे. मंगळवारी फक्त महिलांसाठी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण होणार आहे. १९ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत रोज सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत ‘गणेशयाग’ होणार आहे. २२ सप्टेंबर रोजी दिवसभर ‘अग्निहोत्र’होणार आहे.गणेशाची मूर्ती पुरातन आहे. त्याचा इतिहास अद्याप तरी सापडला नाही. नवसाला पावणारा म्हणून गणपतीची ख्याती आहे. मिरवणुकीचा पहिला मान असतो. स्व. जगन्नाथ आगरकर यांच्या कल्पनेतून १९९२ मध्ये पहिल्यांदा या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. त्यानंतर गतवर्षी मंदिराचे सुशोभिकरण झाले. महाराष्ट्रात विशाल गणपतीच्या उंचीएवढी दुसरी कोणतीही गणपती मूर्ती नाही. अष्टविनायकांमध्येही अशी उंच मूर्ती नाही. भाविकांना मंदिरात आल्यानंतर वातावरण प्रसन्न होते.- पंडितराव खरपुडे, उपाध्यक्ष, देवस्थान ट्रस्ट

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर