शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

गांधींचा भाजप राष्ट्रवादीच्या दावणीला : अनिल राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 12:45 IST

नगरमधील भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रवादी व काँगे्रस पुरस्कृत पार्टी आहे, हे केडगावमध्ये उघड झाले आहे. या तिघांची शिवसेनेविरोधात छुपी युती आहे. 

अहमदनगर : नगरमधील भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रवादी व काँगे्रस पुरस्कृत पार्टी आहे, हे केडगावमध्ये उघड झाले आहे. या तिघांची शिवसेनेविरोधात छुपी युती आहे. गांधींचा भाजप पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला आहे, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांनी केली.गुरुवारी (दि़२९) ‘लोकमत’च्या फेसबुक पेजवरुन राठोड यांची लाईव्ह मुलाखत घेण्यात आली. ‘लोकमत’ टीमने व फेसबुकवर नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना राठोड यांनी दिलखुलास उत्तरे दिली.ते म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराचा नारळ फोडलाय. हा नारळ फोडताना महापौर द्या तरच तीनशे कोटी देतो, असे त्यांचे प्रदेशाध्यक्ष जाहीर करतात. हे मतदारांना त्यांनी दाखवलेले आमिष आहे. तुम्हाला द्यायचेच होते तर यापूर्वी का नाही निधी दिला. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. मग यापूर्वी निधी देण्यासाठी कोणी अडवले होते का? ठाण्यात, कल्याणमध्ये तुम्ही असेच निधी देण्याचे आश्वासन दिले होते. तेथे निधी दिला का? हे पोकळ आश्वासन नगरला नकोय. तुमचे पालकमंत्री, खासदार नगरच्या उड्डाणपुलाबाबत अनेकदा २००-२५० कोटी आणल्याचे सांगत होते. मग पुलाचे काम का नाही केले, नगरला भाजपाने काय दिले, किती निधी शहरासाठी दिला, कोणत्या योजना आणल्या, हे जाहीर करावे. तुम्ही मागील साडेचार वर्षात काहीच केले नाही. फक्त शहराची प्रतिमा मलिन केली. त्यामुळे तुम्ही आता थापा मारणे बंद करा. तुम्ही शहराचा बिहार केला. आम्ही नगर शहर भयमुक्त केले. राष्ट्रवादी ज्यापद्धतीने काम करीत आहेत, त्याचपद्धतीने भाजप काम करीत आहे. ही भाजप पार्टी आम्हाला मान्य नाही. ही बनावट पार्टी आहे. खरे भाजपवाले यांच्यावर नाराज आहेत. नगरमध्ये सोयऱ्या-धाय-यांचे राजकारण सुरु आहे. ते अत्यंत घातक आहे़. हे लोकांच्या लक्षात आले आहे.पंधाडे, डागवाले निष्ठावान नव्हतेच...अंबादास पंधाडे, डागवाले यांसारखे निष्ठावान शिवसेनेला सोडून का गेले, असा प्रश्न विचारला असता राठोड म्हणाले, ते एका पक्षात कधीच टिकले नाहीत. त्यांच्या काही गरजा भागविण्यासाठी ते तिकडे गेले. ते गद्दार आहेत. त्यांना निष्ठावान कसे म्हणता येईल. त्यांची मला प्रश्न विचारण्याची ताकद नाही. बाळासाहेब बोराटे यांनी गतवेळी शिवसेनेला फसवल्यानंतरही त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले याकडे लक्ष वेधले असता राठोड म्हणाले, काहीजण शिवसेना सोडून गेले़ त्याचे फळ त्यांना मिळाले. त्यामुळे ते पुन्हा आमच्याकडे आले. लोकांचे विचार बदलत राहतात. कार्यकर्ते ज्याची मागणी करतात, त्याला आम्ही तिकीट देतो.‘ये रिश्ता क्या कहलाता हैजेथे राष्टÑवादीचे उमेदवार आहेत तेथे भाजपने कमजोर उमेदवार दिले आहेत व जेथे भाजपचे उमेदवार आहेत तेथे राष्टÑवादीने कमजोर उमेदवार दिले आहेत. ही सर्व मॅच फिक्सिंग आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ हे लोक ओळखून असल्याचे राठोड म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका