शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा मुलाखती दरम्यान गांधी-आगरकर समर्थक भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 22:03 IST

शिस्तप्रिय म्हणविणा-या भाजपाच्या नगर येथील इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान इच्छुकांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली़

अहमदनगर: शिस्तप्रिय म्हणविणा-या भाजपाच्या नगर येथील इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान इच्छुकांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली़ माजी खासदार दिलीप गांधी यांचे समर्थक उपमहापौर मालन ढवण यांचे पुत्र संजय, तर  अ‍ॅड़ अभय आगरकर यांचे समर्थक मानले जाणारे संपत नलावडे यांच्यात सायंकाळी जोरदार हाणामारी झाली़ दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने वातावरण निवळले़विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नगर शहरासह जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या बुधवारी मुलाखती झाल्या़ भाजपाचे प्रदेश सरचिणीस रामदास अंबटकर यांच्या उपस्थित येथील तारकपूर येथील अलिशान हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर मुलाखती घेण्यात आल्या़ जिल्ह्यातील अकरा मतदारसंघातून मुलाखती शांतेतत पार पडल्या़ सायंकाळी शहर मतदारसंघातील मुलाखतींना सुरुवात झाली़ मुलीखती दरम्यान भाजपाचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे समर्थक उपमहापौर मालन ढोणे यांचे चिरंजीच संजीव ढोणे व अ‍ॅड़ अभय आगरकर यांचे समर्थक संपत नलावडे यांची हॉटेलच्या परिसरात भेट झाली़ महापौर बाबासाहेब वाकळे हेही ढोणे यांच्यासोबत होते़ हॉटेलच्या प्रवेशव्दारावर  कोण कुणासाठी आले, यावरून दोघांमध्ये वादावादी झाली़ त्याचे रुपांतर हाणामारीत झाले़ दोघांनी एकमेकांच्या कानशिलात लगावली़ त्यानंतर हे दोघे मुलाखती सुरू असलेल्या हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर गेले़ तिथे पदाधिकाºयांसमोर पुन्हा वादावादी झाली़ वाद वाढल्याने मुलाखती थांबवून अंबटकर यांच्यासह पदाधिकारी मुलाखत कक्षातून बाहेर पडले़  प्रदेशाध्यक्ष अंबटकर मात्र दरम्यान तारकपूर येथील हॉटेलमध्ये वादावादी झाल्याची खबर मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले़ मात्र तोपर्यंत वाद निवळला होता़ 

टॅग्स :BJPभाजपाAhmednagarअहमदनगर