शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

साईनगरीतील गणपती बाप्पा झाले ऐंशी वर्षांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:50 IST

साईनगरीतील बाप्पा यंदा ऐंशी वर्षाचे झाले आहेत. शिर्डीतील शाळा मास्तरांनी १९३९ साली शाळेतील मुलांकडून साईनगरीतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा करवून घेतला होता.

प्रमोद आहेर शिर्डी : साईनगरीतील बाप्पा यंदा ऐंशी वर्षाचे झाले आहेत. शिर्डीतील शाळा मास्तरांनी १९३९ साली शाळेतील मुलांकडून साईनगरीतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा करवून घेतला होता.१६ सप्टेंबर १९३९ ते मंगळवार २६ सप्टेंबर १९३९ दरम्यान शिर्डीतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला. शिर्डीतील सर्व शाळा मास्तरांनी मिळून शाळेतील मुलांकडून हा गणेशोत्सव साजरा करून घेतला. यात साईबाल मेळावा साजरा करण्यात आला. गणेश चतुर्थीपासून दहा दिवस व्याख्यान, पोवाडे, भजन, गायन, नाट्यप्रयोग असे कार्यक्रम घेण्यात आले. २६ सप्टेंबर रोजी श्रीगणेशाची मिरवणूक काढून खोबरे, खडीसाखर, डाळ वाटून गणपती विसर्जन करण्यात आले.या पहिल्या गणेशोत्सवाचे साक्षीदार असलेल्या स्वर्गीय नानासाहेब जगताप यांच्या सांगण्यानुसार त्यावेळी मारूती मंदिराशेजारी शाळा भरत असे. गणपती मात्र जुन्या चावडी (खुले नाट्यगृह) शेजारी रावसाहेब तात्याजी गोंदकरांच्या सध्या असलेल्या जागेत बसवण्यात आला होता. यावेळी नरहर अनंत पिटके शाळेचे हेडमास्तर तर आमले, परदेशी आदी शिक्षक होते. या गणेशोत्सवात संभाजी महाराजांवर नाटक बसवण्यात आले होते. यात आमले मास्तरांनी संभाजीची भूमिका केली होती. त्यावेळी रामचंद्र सजन कोते, रहेमान भिकन दारूवाले, सखुबाई चिमाजी सजन, शंकर कचरू शेजवळ, रामराव ठमाजी शेळके, रामचंद्र कचरदास लोढा, रावसाहेब तात्याजी गोंदकर, तुळशीराम निवृत्ती गोंदकर तसेच रूई येथील तात्या शंकर वाणी, ताराचंद शंकर कडू, रामराव विठ्ठलराव वाबळे, बाजीराव वाबळे आदी विद्यार्थी होते.या उत्सवांची परंपरा रोहम गुरूजींनी पुढे सुरू ठेवली. ते शाळेत गणेशोत्सव साजरा करत. कार्यक्रमाबरोबरच ग्रामस्वच्छताही असे़ याच काळात ३० आॅगस्ट, १९६५ पासून संस्थान कर्मचा-यांनीही दीक्षित वाड्यात गणेशोत्सवास सुरुवात केली. १९६२ ते १९६७ दरम्यान सरपंच रावसाहेब गोंदकर यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून हा उत्सव साजरा झाला़ यात हरिभाऊ शेळके, बाजीराव कोते, राजाराम कोते, देवराम शेळके, शालीग्राम नागरे, सोपान कोते, ज्ञानेश्वर शेळके आदींचा सहभाग असे. १९६७ साली देणगी नाकारल्यामुळे पन्नालाल तोडरवाल या व्यापाºयाच्या घरावर गावाने बहिष्कार टाकला. यानंतर तीन वर्षे सार्वजनिक गणपतीच बसवण्यात आला नाही.नंतरच्या काळात सरपंच मुकुंदराव कोते, उपसरपंच भानुदास गोंदकर, गणपत ठमाजी शेळके, गोविंद शंकर कोते, ज्ञानदेव निवृत्ती गोंदकर आदी सार्वजनिक गणपती बसवत़ १९७१ च्या सुमारास दुष्काळात सार्वजनिक गणपती बसवू नये व वर्गणी गोळा करू नये, अशी दवंडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून देण्यात आली़ यावर बाबूराव पुरोहित, रामनाथ निर्मळ, विठ्ठलराव शिंदे, अशोक जगताप, जव्हेरीशेट संकलेचा, देवराम बन्सी कोते, विठ्ठल शेळके, शामलाल गंगवाल, संपतकाका गोंदकर, सूर्यभान निवृत्ती कोते, सर्वोत्तम कुलकर्णी आदी तरुणांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीचा निर्णय धुडकावत २५ आॅगस्ट १९७१ रोजी चावडी मंदिरासमोर व अब्दुलबाबा झोपडीच्या पश्चिमेस गणेश स्थापना केली. या गणेशोत्सवातच सन्मित्र युवक मंडळाची स्थापना झाली़आता ३० पेक्षा अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कार्यरत आहेत़

टॅग्स :Saibaba Mandirसाईबाबा मंदिरAhmednagarअहमदनगर