शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साखर हंगामाची भट्टी पेटली; १०० टक्के एफआरपी अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 14:07 IST

अहमदनगर जिल्ह्यात खाजगी व सहकारी अशा प्रकारचे एकूण २३ साखर कारखाने कार्यरत आहेत. त्यातील २२ कारखान्यांना साखर आयुक्तांनी ऊस गाळप परवाना दिलेला आहे. हिरडगाव येथील साईकृपा या खाजगी कारखान्यास अजून परवानगी देण्यात आलेली नाही.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : येत्या १ नोव्हेंबरपासून राज्यातील साखर कारखान्यांच्या ऊस गळीत हंगामास सुरूवात आहे. त्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची भट्टी पेटली आहे.दसºयापासूनच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा बॉयलर पेटण्यास सुरूवात झाली आहे.अहमदनगर जिल्ह्यात खाजगी व सहकारी अशा प्रकारचे एकूण २३ साखर कारखाने कार्यरत आहेत. त्यातील २२ कारखान्यांना साखर आयुक्तांनी ऊस गाळप परवाना दिलेला आहे. हिरडगाव येथील साईकृपा या खाजगी कारखान्यास अजून परवानगी देण्यात आलेली नाही. या कारखान्याने देखील गाळपासाठी आयुक्तांकडे परवानगी मागितलेली आहे. त्यामुळे या हंगामात जिल्ह्यातील हे सर्व २३ कारखाने सुरू होणार आहेत. आतापर्यंत अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखाना, लोणीचा पद्मश्री विखे सहकारी साखर कारखाना, विखे कारखान्याने भागिदारी तत्वावर चालविण्यासाठी घेतलेला राहाता तालुक्यातील गणेश, राहुरीचा तनपुरे सहकारी साखर कारखाना, प्रसाद खाजगी कारखाना, नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर व मुळा सहकारी साखर कारखाना, संगमनेरचा थोरात सहकारी कारखाना, कोपरगावचा संजीवनी व काळे सहकारी कारखाना, पाथर्डीचा वृद्धेश्वर सहकारी कारखाना, पारनेरचा भाडे तत्वावरील क्रांती शुगर, जामखेडचा अंबालिका, जय श्रीराम, श्रीगोंदा तालुुक्यातील साईकृपा-१ (देवदैठण), शेवगाव तालुक्यातील गंगामाई खाजगी कारखाना यांचा बॉयलर पेटला आहे. रविवार १५ आॅक्टोबरला श्रीगोंदा सहकारी कारखाना, भाडे तत्वावरील नगर तालुक्यातील पियुष या कारखान्यांचा बॉयलर पेटणार आहे.

१०० टक्के एफ. आर. पी. अदा

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व २३ साखर कारखान्यांनी सरकारी निर्देशांप्रमाणे त्यांना ऊस पुरवठा केलेल्या शेतकरी सभासदांना उसाची किमान आधारभूत किंमत (एफ. आर.पी.) पूर्णपणे अदा केली आहे. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा कारखान्याने शेतक-यांची कोट्यवधी रुपयांची रक्कम थकविल्याने या कारखान्यावर जप्तीची नामुष्की ओढावली होती. पण या कारखान्यानेसुद्धा थकबाकी अदा केली आहे. त्यामुळे हा कारखाना या हंगामात उसाचे गाळप करण्यास सज्ज झाला असून त्यासाठी त्यांनी साखर आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला आहे.

आणखी दोन खाजगी कारखाने

जिल्ह्यात साखर कारखाने उदंड झाले असताना आणखी दोन नवीन खाजगी साखर कारखान्यांची यात भर पडणार आहे. एक कारखाना संगमनेर तालुक्यात होत असून दुसरा कारखाना नेवासा तालुक्यात होत आहे. संगमनेरच्या कारखान्याच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर