भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील मार्केट यार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उबेद शेख, परिमल निकम, चर्मकार विकास संघाचे सुरेश खामकर, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, ओबीसी सेलचे अमित खामकर, अल्पसंख्याक विभागाचे साहेबान जहागीरदार, माजी नगरसेवक अजय दिघे, उपाध्यक्ष नीलेश इंगळे, महादेव कराळे, एकनाथ भिंगारदिवे, मळू गाडळकर, संध्या मेढे, गणेश बोरुडे, अक्षय भिंगारदिवे, मनीष साठे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. माणिक विधाते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलित व दुर्बल घटकातील जनतेसाठी महान कार्य केले. कोरोनाच्या संकटकाळात गरजूंना खऱ्या अर्थाने मदत करण्याची आज गरज आहे. वंचितांसाठी कार्य करण्याची भावना प्रत्येकाने मनात ठेवल्यास हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरणार असल्याचे ते म्हणाले.
फोटो -लिस्टमध्ये आहे.
ओळी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आमदार संग्राम जगताप. समवेत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उबेद शेख, परिमल निकम, सुरेश खामकर, सुरेश बनसोडे, मित खामकर, साहेबान जहागीरदार आदी.