शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चौंडी विकास प्रकल्पाचा निधी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 17:57 IST

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडीचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी ३६ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, सरकारने दिलेला साडेसहा कोटींचा निधी योग्य नियोजनाअभावी पडून आहे. 

जागतिक पर्यटन दिन विशेष/ सत्तार शेख/  हळगाव :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडीचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी ३६ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, सरकारने दिलेला साडेसहा कोटींचा निधी योग्य नियोजनाअभावी पडून आहे. चौंडी विकास प्रकल्पाला प्रस्तुत प्रतिनिधीने गुरूवारी भेट दिली असता अहिल्येश्वर मंदिराच्या मागील परिसरातील भाग कोसळण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून आले. तसेच मंदिर परिसरात ठिकठिकाणी फरशी उखडलेली आढळून आली. गढी परिसरासह स्मृतीस्तंभाच्या भागातील भिंतींना चिरा पडल्या असल्याचे आढळून आले. दरम्यान काही स्थानिक नागरिक नक्षत्र गार्डनचा तसेच मंदिरांचा वापर झोपण्यासाठी करताना दिसले. चौंडी विकास प्रकल्पाची सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक विकास प्रतिष्ठान या ट्रस्टच्या वतीने देखभाल केली जात आहे. ट्रस्टने अहिल्यादेवी स्मारक परिसराच्या देखरेखीसाठी दोन कर्मचाºयांची नेमणूक केलेली आहे. चौंडी प्रकल्प पर्यटकांना पाहण्यासाठी मोफत खुला आहे. शासनाने चौंडी विकास प्रकल्पाला भरिव निधी दिल्यास दुष्काळी जामखेड तालुक्यातील महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून चौंडी नावारूपास येऊ शकेल. त्यातून दुष्काळी जामखेड तालुका विकासाच्या नव्या उंचीवर येण्यास मदत होईल...ही कामे झालीस्मृतीस्तंभ, गढी परिसर विकास, शिल्पसृष्टी, मंदिरांचा जीर्णोद्धार, नक्षत्र गार्डन,  प्राथमिक शाळा, पुर्नवसित घरकुले, चापडगाव येथे कमान,  हेलिपॅड, सीना नदीवरील पूल, मानकोजी शिंदे सभागृह, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, विश्रामगृह, शिल्प सृष्टीचा परकोट, उद्यानाची संरक्षक भिंत...ही कामे बाकी सीना नदीवरील पुलाच्या पश्चिमेकडील बाजूस २०० मीटर लांबीचा नदीघाट व नौकायन, सीना नदीवरील बंधाºयाची उंची वाढवणे, सीना नदीवर पोटबंधारा बांधणे, सीना नदीवरील पूर्वेकडील बाजूस चौपाटी उभारणे, नक्षत्र उद्यानातील पुतळ्यांना संरक्षक छत्री, काचा बसवणे, गढी परिसरातील डागडुजी, तळघरांचा जीर्णोद्धार, संग्रहालय, अंतर्गत पक्के रस्ते, मीडिया सेंटर, लाईट शो, अहिलेश्वर मंदिर ते गढी संरक्षक भिंत बांधणे, भक्तनिवास बांधणे. प्रशासनाचे उदासीन धोरणपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडीचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी १९९५ पासून सरकारने चौंडी विकास प्रकल्प हाती घेतला खरा. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रकल्पासाठी सरकारने देऊ केलेला साडेसहा कोटींचा निधी धूळखात पडून राहिल्यामुळे प्रकल्पाचा विकास रखडला आहे, असे माजीमंत्री अण्णा डांगे यांनी सांगितले.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर