९ फेब्रुवारी रोजी अर्जुन काशिनाथ जाधव (वय ६३, रा. मल्हारवाडी, ता. राहुरी) यांनी ही फिर्याद दिली होती. ते ट्रकमध्ये (एमएच १६- एवाय ९८३३) ४ लाख रुपये किमतीच्या साडेचारशे गोण्या कांदा वांबोरी मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जात असताना राहुरीजवळ आरोपी श्यामराव भागवत गाडे (रा. घोरपडवाडी, ता. राहुरी) व त्याच्याबरोबर असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी ट्रक अडवून बळजबरीने ट्रक चोरून नेला. या गुन्ह्यात आरोपी प्रमोद कराळे हा फरार होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडूनही सुरू होता. आरोपी कराळे हा वसंत टेकडी येथे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावून आरोपी प्रमोद बाळासाहेब कराळे यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध यापूर्वीचेही अनेक गुन्हे दाखल आहेत.
दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:20 IST