शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीचा ८०-२० फॉर्म्युला अमान्य :रघुनाथदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:56 IST

कायद्याची मोडतोड करून भाजप सरकार व साखर कारखानदार एकरकमी एफआरपीचे तुकडे करून ८० टक्के आधी व २० टक्के पैसे नंतर देण्याचा एफआरपीचा ८०-२० असा नवीन फॉर्म्युला आणू पाहत आहेत.

रमेश शिंदेपाचेगाव : कायद्याची मोडतोड करून भाजप सरकार व साखर कारखानदार एकरकमी एफआरपीचे तुकडे करून ८० टक्के आधी व २० टक्के पैसे नंतर देण्याचा एफआरपीचा ८०-२० असा नवीन फॉर्म्युला आणू पाहत आहेत. त्यास आमचा विरोध आहे. या एफआरपी फॉर्म्युलाला ऊस पट्टयातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करावा. शेतकरी विरोधात हे सरकार वेगवेगळे प्रयोग करू पाहत आहे. काँग्रेस व भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना पर्याय म्हणून शेतकरी संघटना महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका लढविणार आहे, असे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.गंगापूर (जि. औरंगाबाद) येथे शेतक-यांच्या बैठकीसाठी जाताना ते शुक्रवारी नेवासा तालुक्यातील पाचेगाव फाटा येथे शेतकºयांच्या आग्रहास्तव थांबले होते. यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट, शिवाजीनाना नांदखिले हे नेते उपस्थित होते.‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, शेतक-यांच्या संमतीशिवाय ऊस बिलाच्या रकमेतून कर्जवसुली होता कामा नये. होणारी वसुली जिल्ह्यातील कारखान्यांनी थांबविली पाहिजे. काँग्रेस सरकारने शेतकरीविरोधी धोरणे, कायदे केले. आताचे भाजप सरकार ते राबविण्याचे प्रयत्न करीत आहे. १०० टक्के एफआरपीसाठी कारखानदार व सरकार विरोधात शेतकºयांनी लढा उभारावा. महाराष्ट्रातील दरवर्षी पडणारे दुष्काळ हे काँग्रेस व भाजप सरकारचा नाकर्तेपणा आहे. साखर कारखाने, बाजार समिती, दूध संघ यांच्यावर कोणतीही कारवाई राज्य सरकारकडून होत नाही, याचा अर्थ असा आहे की, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांचा भाजप-शिवसेना सरकारला छुपा पाठिंबा आहे. यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही शेतक-यांसाठी पर्याय उभा करणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यात शेतकºयांच्या उसाच्या एफआरपीच्या रकमेचे तुकडे करू पाहणारे शेतक-यांच्या नावाने चळवळ उभी करू पाहत आहे. हे नेते गवतातील हिरवे साप आहेत, अशी टीका पाटील यांनी अनिल घनवट यांचे नाव न घेता यावेळी केली. रघुनाथदादा पाटील यांचा नेवासा तालुक्यातील शेतक-यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेचे नेवासा तालुकाप्रमुख हरिभाऊ तुवर, संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते वामनराव तुवर, भास्कर तुवर, कैलास पवार, भगीरथ पवार, कर्णासाहेब तुवर, अभय तुवर आदी शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर