शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

कोपरगावात धनगर समाजाचा आरक्षणासाठी मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 16:44 IST

शहरातून कोपरगाव तालुका धनगर आरक्षण अंमलबजावणी समिती व धनगर समजाच्या वतीने मेंढ्यासह पारंपारिक पद्धतीने जागरण गोंधळ करत शहरातील खंडोबा मंदिरापासून भव्य मोर्चा काढत आरक्षणासह इतरही मागण्याचे निवेदन तहसीलदार किशोर कदम यांना देण्यात आले.

ठळक मुद्देतहसीलदारांना दिले विविध मागण्याचे निवेदन  

कोपरगाव : शहरातून कोपरगाव तालुका धनगर आरक्षण अंमलबजावणी समिती व धनगर समजाच्या वतीने मेंढ्यासह पारंपारिक पद्धतीने जागरण गोंधळ करत शहरातील खंडोबा मंदिरापासून भव्य मोर्चा काढत आरक्षणासह इतरही मागण्याचे निवेदन तहसीलदार किशोर कदम यांना देण्यात आले.  तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील धनगर समाजातील बांधवानी शुक्रवारी सकाळी शहरातून भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता. धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीच्या सवलती तत्काळ लागू कराव्यात. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव द्यावे. काळानुरूप बंद पडत असलेल्या मेंढ्या चारण्याच्या व्यवसायाला राखीव कुरण मिळावे. आंदोलनांमधील धनगर आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे. आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या धनगर बांधवांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.     यावेळी विजय वहाडणे, शरद खरात, संजय कांबळे, प्रकाश करडे, शिवाजी कवडे, दीपक कांदळकर, योगेश नरोडे, रमेश टिक्कल, राजेंद्र टिक्कल, बापूसाहेब शिंदे, शिवाजीराव शेंडगे, ज्ञानेश्वर गोंधळे, प्रभाकर शिंदे, सचिन कोळपे यांनी भाषणे केली. विविध संघटनाच्या वतीने धनगर समाजाच्या मागणीला पाठींबा दिला. या निवेदनावर प्रभाकर शिंदे, राजेंद्र नावडकर, किरण थोरात, सचिन कोळपे, जालिंदर चितळकर, विलास कोळपे, बाबासाहेब पानसरे, अशोक काकडे, आशिष वाघमारे, पंकज जाधव, अशोक मतकर, दत्तात्रय बढे, गणेश करडे, नंदू बडे, जालिंदर शेळके, भाऊसाहेब शेळके, ज्ञानेश्वर कोळपे, आशिष वाघमारे, शिवाजीराव शेंडगे, ज्ञानेश्वर गोंधळे यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव