शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाळकी येथील पियुश शुगर कारखान्यासमोर नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 17:37 IST

नगर तालुक्यातील वाळकी येथील पियुश शुगर या साखर कारखान्याने फसवणूक केल्याचा आरोप करीत नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक, शेतकरी संघटना व मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. १८) सकाळपासून कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

केडगाव : नगर तालुक्यातील वाळकी येथील पियुश शुगर या साखर कारखान्याने फसवणूक केल्याचा आरोप करीत नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक, शेतकरी संघटना व मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. १८) सकाळपासून कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.शेतकरी संघटनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सचिन चोभे यांनी आंदोलनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, पाण्याअभावी नगर तालुक्यात उसाचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळेच येथील पियुश शुगर हा खासगी साखर कारखाना नेवासा, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, राहुरी व पाथर्डी आदी तालुक्यातील उसावर चालविला जातो. मात्र, यंदा या कारखान्याने मागील वर्षी २५०० रुपयांचा भाव दिला होता. यंदाही मागील वर्षीपेक्षा किमान ५० रुपये जादा भाव देण्याचे आश्वासन देऊन ऊस आणला होता. मात्र, आता फक्त २२०० रुपये प्रतिटन भाव देण्याचे कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच ४८ दिवसांपासूनचे पेमेंटही कारखान्याने जमा केलेले नाही. त्यामुळेच १५ दिवसांत पैसे जमा न करून या कारखान्याने शेतकरी बांधवांची फसवणूक केली आहे. याच फसवणुकीमुळे साखर संचालनालयाने या कारखान्यावर नियमानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. मात्र, सत्ताधारी भाजपा नेत्यांच्या वरदहस्ताने चालणा-या या कारखान्यालाच साखर आयुक्तालयाने अभय दिले आहे. सरकारी कृपेने मोकळे रान मिळाल्यानेच हा कारखाना शेतक-यांची पिळवणूक करीत आहे. याविरोधात उग्र आंदोलन पुकारतानाच प्रसंगी गव्हाणीत आत्मदहन करण्याचीही शेतकरी बांधवांची भावना आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून त्यांच्या पक्षाच्या छत्रछायेखाली सुरू असलेल्या कारखान्याच्या फसवणुकीबद्दल कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी रविंद्र आगळे यांनी केली आहे. यावेळी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे, विजय निकम, संदीप लंघे, अनिल पोटे, सतिश पोटे, महेश कदम, दत्तात्रय लांडे, विनोद पोटे, अरुण देशमुख, बाबासाहेब निकम, बाबासाहेब वाकळे, आंबादास घुले यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

...तर आंदोलन पेटेल : दहातोंडे

संभाजी दहातोंडे म्हणाले, शेतक-यांवर अन्याय होत असतानाही सरकार व प्रशासन ढिम्म आहे. परिणामी पियुश शुगर कारखान्याकडून शेतक-यांची लूट केली जात आहे. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. यावर तातडीने न्याय न दिल्यास हेच आंदोलन हिंसक होईल. याची जबाबदारी कारखाना प्रशासनाची राहील.

कारखान्यावर गुन्हा दाखल करा : चोभे

सचिन चोभे म्हणाले की, कारखाना प्रशासन उतारा कमी येत असल्याचे कारण देऊन लूट करीत आहे. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. तसेच १५ दिवसांत पेमेंटही जमा केलेले नाही. त्यामुळेच याप्रकरणी साखर आयुक्तांनी कमी उतारा येण्याच्या प्रकरणाची चौकशी करावी व शेतक-यांची फसवणूक केल्याप्रकरणी कारखान्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने