कोपरगाव : धनगर समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवारी कोपरगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्षत्रिय धनगर सेवा संघाच्या वतीने आरक्षण अंमलबजावणी मोर्चा काढण्यात आला़देशातील कर्नाटक, बिहार, उत्तरप्रदेश आदी राज्यात धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या संवर्गातील आरक्षण आहे़ मग महाराष्ट्रातच का नाही? असा सवाल समाजबांधवांनी केला़ सध्याचे केंद्र व राज्यातील सरकार सत्तेवर येण्यात धनगर समाजाचा शंभर टक्के वाटा आहे़ आता आरक्षण द्या नाही तर चालते व्हा, असा इशारा यावेळी देण्यात आला़ हिवाळी अधिवेशनापूर्वी समाजाला आरक्षण जाहीर न केल्यास दि़ ८ डिसेंबर रोजी नागपूर येथील अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.कोपरगाव येथील साईबाबा कॉर्नर येथून मोर्चास सुरुवात झाली़ मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यानंतर तेथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले़ यावेळी धनगर सेवा संघाचे राज्य अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, सचिव रमेश टिक्कल, रासपचे जिल्हाध्यक्ष शरद बाचकर, विजय तमणर, किरण थोरात, निवृत्ती कोळपे, ज्ञानेश्वर कोळपे, प्रभाकर शिंदे, दीपक कांदळकर, प्रकार करडे, बाळासाहेब बडे, त्र्यंबकराव सरोदे, शरद बाचकर, राजेंद्र जानराव, गिधाड, सूर्यभान कोळपे आदींची भाषणे झाली़ आपल्या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले़ (प्रतिनिधी)
धनगर आरक्षणासाठी मोर्चा
By admin | Updated: December 24, 2015 23:32 IST