शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक लढाईत अपक्षांची उडी;  काळे-कोल्हे यांच्यासमोर परजणे-वहाडणे यांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 12:37 IST

कोपरगाव विधानसभा मतदार संघ हा काळे आणि कोल्हे या दोन कुटुंबाच्या पारंपरिक लढतीचा मानला जातो. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे गेली अनेक वर्ष या मतदार संघावर अधिराज्य होते. गेल्या निवडणुकीत त्यांच्या सुनबाई स्नेहलता कोल्हे या भाजपकडून आमदार म्हणून निवडून आल्या.

कोपरगाव विधानसभा वार्तापत्र - रोहित टेके कोपरगाव विधानसभा मतदार संघ हा काळे आणि कोल्हे या दोन कुटुंबाच्या पारंपरिक लढतीचा मानला जातो. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे गेली अनेक वर्ष या मतदार संघावर अधिराज्य होते. गेल्या निवडणुकीत त्यांच्या सुनबाई स्नेहलता कोल्हे या भाजपकडून आमदार म्हणून निवडून आल्या. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा त्याच उमेदवार आहेत.  याच मतदार संघात सलग दोनदा आमदार म्हणून निवडून आलेले अशोक काळे यांचे पुत्र आशुतोष काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी करीत रिंगणात उतरले आहेत. राजेश परजणे व विजय वहाडणे यांनी अपक्ष म्हणून उडी घेतल्याने काळे-कोल्हे यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे.   गेल्या चार पंचवार्षिक निवडणुका या दोन घराण्यामध्येच रंगत असल्याचे चित्र होते. परंतु गेल्या नगरपालिका निवडणुकीत विजय वहाडणे यांनी प्रस्थापित काळे -कोल्हे या दोन्ही घराण्यांना बाजूला सारत नगराध्यक्ष पद मिळविले. वहाडणे हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांचे पूत्र आहेत. यंदाच्या निवडणुकीत या दोनही घराण्यांच्या विरोधात ते पुन्हा दंड थोपटत मैदानात उतरले आहेत. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांची सासुरवाडी असलेले दिवंगत नामदेवराव परजणे यांचे घराणे गेल्या वीस वर्षांपासून आमदारकीच्या लढतीपासून अलिप्त होते. या घराण्यातील राजेश परजणे आता मैदानात आहेत. लढत चौरंगी झाल्याने अंदाज बांधणे अवघड झाले आहे. शहरासाठी भाजप सत्तेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणला. निळवंडेच्या पाणी प्रश्नासाठी आपण पाठपुरवा केला ही मांडणी आमदार स्रेहलता कोल्हे सभांतून करत आहेत. आमदारांना पाणी प्रश्न सोडविता आला नाही. तालुक्यातील रस्ते, रोजगार याचे प्रश्न प्रलंबित आहेत. विकास फक्त बॅनरवर दिसतो, अशी टीका आशुतोष काळे करत आहेत. राजेश परजणे हे शेतक-यांचे प्रश्न, रोजगार निर्मिती व पाणी प्रश्नावर सभांमधून मांडणी करत आहेत. प्रस्थापितांना एवढी वर्षे संधी दिली. मला एकदा द्या, असे आवाहन ते करत आहेत. विजय वहाडणे हे भाषणांतून प्रस्थापितांवर टीका करत आहेत. काळे-कोल्हे या दोन्ही घराण्यांनी तालुक्याचे शोषण केले, असे त्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019