रोटरीचे प्रांतपाल हरीश मोटवानी, फर्स्ट लेडी रेणू मोटवानी यांनी नुकतीच डॉ. गरूड हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. मोफत उपचारासह कॅन्सर तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे. डॉ. प्रकाश गरुड यांनी ३० हजारांहून अधिक कॅन्सर रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना नवीन जीवन प्रदान केले आहे. गरुड हॉस्पिटल येथे सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया, कॅन्सर केमोथेरपी, रेडिओथेरपी, मॅमोग्राफी, ब्रेस्ट कॅन्सर शस्त्रक्रिया, बेरस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी, हेड अॅण्ड नेक कॅन्सर, जबड्याचे, घशाचे, जिभेचे, स्वरयंत्राचे, ब्रेन, थायरॉईड कॅन्सरवर शस्त्रक्रिया व उपचार केले जातात. याशिवाय गर्भपिशवी, अंडाशयाचे कॅन्सर, किडनी, मूत्राशयाचे, जठर, लिव्हर, स्वादूपिंडाचे, पित्ताशयाचे कॅन्सर, फुफ्फुसाचे कॅन्सर, हाडांचे कॅन्सर, त्वचेचे कॅन्सर आदी प्रकारच्या कॅन्सरवर शस्त्रक्रिया व उपचार उपलब्ध आहेत, अशी माहिती कॅन्सर सर्जन डॉ. प्रकाश गरुड व डॉ. पद्मजा गरुड यांनी दिली. (वा.प्र.)
-------
फोटो - २९डॉ. गरूड