शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मोफत सायकल.. नको रे भाऊ; नगर जिल्हा परिषदेवर लाभार्थी शोधण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 13:16 IST

आधी स्वत: सायकल विकत घेऊन त्याची पावती जिल्हा परिषदेत जमा केल्यानंतरच अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे. याचाच अर्थ सायकल विकत घेऊन अनुदानाची वाट पाहत बसावे लागणार असल्याने मोफत सायकल नको म्हणण्याची वेळ पालक व विद्यार्थ्यांवर आली आहे.

ठळक मुद्देआधी स्वत: सायकल विकत घेऊन त्याची पावती जिल्हा परिषदेत जमा केल्यानंतरच अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे मोफत सायकल नको म्हणण्याची वेळ पालक व विद्यार्थ्यांवर आली आहे.एखाद्याकडे सायकल घेण्यासाठी आग्रह धरावा आणि निधी मिळालाच नाही तर काय, या भीतीने सदस्यही सायकल योजनेबाबत मौन बाळगून आहे.

अहमदनगर : आधी स्वत: सायकल विकत घेऊन त्याची पावती जिल्हा परिषदेत जमा केल्यानंतरच अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे. याचाच अर्थ सायकल विकत घेऊन अनुदानाची वाट पाहत बसावे लागणार असल्याने मोफत सायकल नको म्हणण्याची वेळ पालक व विद्यार्थ्यांवर आली आहे.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत दरवर्षी मोफत सायकल योजना राबविण्यात येते. लाभार्थींची निवड करून जिल्हा परिषदेमार्फत सायकलींचे वाटप होत असे. शाळेचा अणि उत्पन्नाचा दाखला दिल्यास सायकल मिळत होती. त्यामुळे मोफत सायकल योजनेंवर अक्षरश: उड्या पडत. यंदा मात्र योजनेत बदल झाला. सायकल न देता अनुदान द्यावे, असा आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेने सायकलींसाठी ६ कोटींची तरतूद केली.पुरुष व स्त्री सायकलींसाठी प्रत्येकी चार ते ४ हजार ५०० रुपये, याप्रमाणे ७ हजार ३६६ लाभार्थींची निवड केली जाणार आहे. समितीने प्रति सदस्य ८० सायकलींचा कोटा निश्चित करून टाकला़ निधी येण्याच्या हालचाली सुरू झाल्या की इकडे प्रस्ताव दाखल करण्यासाठी सदस्यांची स्पर्धा लागते. मात्र सायकल योजनेत सदस्यांनाही फारसा रस नाही. कारण एखाद्याकडे सायकल घेण्यासाठी आग्रह धरावा आणि निधी मिळालाच नाही तर काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.कार्यक्षेत्रात सदस्यांनी मोफत सायकल योजनेची कार्यकर्त्यांमार्फत जाहिरात केली. गरजूंना सायकलीचे निरोप देताना आधी सायकल खरेदी करा, मग निधी मिळेल, असेही आवर्जून सांगितले आहे.सायकल घ्यायला पैसे असते तर तुमच्याकडे कशाला आलो असतो, असेही काहीजण बोलून दाखवित आहेत. कार्यक्षेत्रात अधिकाधिक सायकलींचे वाटप केल्यास सदस्यांना त्याचा राजकीय लाभ उठविता येत असे. त्यामुळे सदस्यही शिफारसी देत. पण, इथे सायकल आधी विकत घ्यावी लागणार असल्याने तुम्हीच द्या सायकल घेऊन पैसे खात्यात जमा झाले की देतो, असाही आग्रह काहीजण सदस्यांकडे धरतील. या भीतीने सदस्यही सायकल योजनेबाबत मौन बाळगून असल्याने योजना बारगळण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषद