शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर येथे दागिने उजळून देण्याच्या बाहण्याने महिलेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 20:58 IST

पतंजली पावडरने सोन्याचे दागिने उजळून देण्याचा बहाणा करीत महिलेची फसवणूक करणा-या दोघांनी नऊ तोळ्यांचे १ लाख ८० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.

संगमनेर : पतंजली पावडरने सोन्याचे दागिने उजळून देण्याचा बहाणा करीत महिलेची फसवणूक करणा-या दोघांनी नऊ तोळ्यांचे १ लाख ८० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. ही घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास चंद्रशेखर चौक परिसरातील एका घरात घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शोभना चंद्रशेखर मुळे (रा. चंद्रशेखर चौक, संगमनेर) यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. शोभना मुळे या चंद्रशेखर चौकातील घरात सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास एकट्याच होत्या. यावेळी तेथे आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना पतंजली पावडरने सोन्याचे दागिने उजळून देतो, असे सांगितले. त्या दोघांवर मुळे यांनी विश्वास ठेवत घरातील नऊ तोळे सोन्याचे दागिने आणून दिले. या दागिन्यांवर काहीतरी प्रक्रिया करीत दागिने उजळून देणा-यांपैकी एकाने त्यांना बोलण्याच्या नादात गुंतवित दुस-याने दागिने घेऊन पोबारा केला. त्यानंतर मुळे यांच्याशी बोलणा-यानेही तेथून पळ काढला. काही वेळाने दागिन्यांची चोरी झाल्याचे मुळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस काँस्टेबल रामनाथ सानप तपास करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर