शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या चौघा साधूंना मारहाण; संगमनेर शहरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:08 IST

साधूंवर घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क , संगमनेर (जि. अहिल्यानगर) : त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या चौघा साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास नवीन नगर रस्त्यावरील कुटे हॉस्पिटलजवळ घडली. मारहाण झालेल्या चारही साधूंवर घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदविले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

मारहाण झालेल्या साधूंपैकी एकाने सांगितले की, आम्ही त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे जात होतो.  चहा घेण्यासाठी उतरलो. तो घेऊन निघालो होतो. त्यावेळी काही जण आम्हाला आडवे झाले. तुम्ही इकडे कसे काय आले, असे म्हणत त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. चार-पाच जणांनी मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.  त्यांनी आम्हा सर्वांना बेदम मारहाण केली. मारहाण करणारे हिंदीत बोलत होते.

यापूर्वीच्या घटना...एप्रिल २०२० मध्ये पालघर जिल्ह्यांत दोन साधूंची मारहाण करून हत्या करण्यात आली होती. तर मुले चोरणारी टोळी समजून ४ साधूंना बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार सांगलीत २०२२ मध्ये उघडकीस आला होता. 

मारहाण करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत असून, त्यांच्यावर कायदेशीररीत्या कारवाई होणार आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, कुणीही तणावाची परिस्थिती निर्माण करू नये.- डॉ. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलिस अधिकारी, संगमनेर उपविभाग

अनेकांनी केला मारहाणीचा निषेध - साधूंना मारहाण होत असताना कुणीतरी ते मोबाइलमध्ये चित्रित केले. हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. - मारहाण करायला सुरुवात केल्यानंतर चौघेही साधू जीव वाचविण्यासाठी पळू लागले. मात्र, त्यांच्या पाठीमागे पळतच त्यांना मारहाण करण्यात आली. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी आदी हिंदुत्ववादी संघटनांसह अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगर