शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
3
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
4
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
5
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
6
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
7
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
8
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
9
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
10
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
11
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
12
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
13
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
14
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
15
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
16
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
17
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
18
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
19
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
20
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 

व्यापाऱ्यांना लुटणारे चौघे गजाआड

By admin | Updated: May 26, 2016 23:58 IST

अहमदनगर : मुंबई येथील सराफा व्यापाऱ्यांकडील ३१ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या चौघांंना कोतवाली पोलिसांनी पंढरपूर येथे गजाआड केले.

अहमदनगर : मुंबई येथील सराफा व्यापाऱ्यांकडील ३१ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या चौघांंना कोतवाली पोलिसांनी पंढरपूर येथे गजाआड केले. कोतवाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविल्याने २४ तासात चोरट्यांना गजाआड करण्यात यश मिळाले. मात्र या चोरीमागील मास्टरमार्इंड वेगळाच असण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. मुंबई येथील क्रिएटिव्ह ज्वेलरी या फर्मचे सेल्समन (व्यापारी) जगदीश मदन पुरोहित आणि धीरज जैन यांनी मंगळवारी दिवसभर सराफा बाजारात सोन्याच्या दागिन्यांची मार्केटिंग केली. त्यानंतर बसस्थानकाकडून बुरुडगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये रात्री साडेआठ वाजता पायी जाताना चार ते पाच जणांनी त्यांच्या डोळ््यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडील ३१ लाख रुपये किमतीचे दागिने बळजबरीने हिसकावले आणि ते पसार झाले. पुरोहित यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि २४ तासात गुन्ह्याचा छडा लावला. पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तातडीने गुन्ह्याचा तपास हाती घेतला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध लागला. परिसरातील टॉवरवरून चोरट्यांचे मोबाईल क्रमांक आणि त्यांचे लोकेशन पंढरपूरमध्ये असल्याचे आढळून आले. त्यानुसार पथकाने गुरुवारी सकाळी चौघांना पंढरपूरमधून अटक केली.मैनोद्दिन ईलियास शेख, तौफिक ईलियास शेख, पंकज विठ्ठल गायकवाड, महेश सुभाष भिंगारे (रा.पंढरपूर, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरी गेलेले सर्व ३१ लाख रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले आहे, अशी माहिती उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी पत्रकारांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, संदीप पाटील, उपनिरीक्षक गजानन करेवाड, पोलीस नाईक रमेश गांगर्डे, नितीन उगलमुगले, सुधीर खाडे, अभिजित अरकल, गोरे, लोंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी)चोरटे ज्या कारमध्ये पळून गेले, त्या कारची नंबर प्लेट बनावट होती. कारमध्ये बसण्याआधी त्यांनी कारची प्लेट बदलली. चोरटे कारमध्ये बसून पळून गेल्याचे चित्रीकरण डॉ. बन्सी शिंदे हॉस्पिटलच्या वेब कॅमेऱ्यात कैद झाले होते. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांना स्थानिक नागरिकांची मोठी मदत झाली. गुन्ह्यातील कारसह चालक अद्याप फरार आहे. दरम्यान या गुन्ह्यात पोलिसांची संशयाची सुई वेगळ््याच दोघांवर असल्याचे समजते.