शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू;  नगर जिल्ह्यातील तिघांचा तर औरंगाबादमधील एकाचा मृतांमध्ये समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 18:51 IST

गुजरातमधील कुबेर या ठिकाणाहून दर्शन घेऊन परतीच्या प्रवासादरम्यान नर्मदा शहरानजीक कार-ट्रकच्या भीषण अपघातात राहाता नगर जिल्ह्यातील तिघांचा तर औरंगाबाद येथील एकाचा  दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली.

लोणी : गुजरातमधील कुबेर या ठिकाणाहून दर्शन घेऊन परतीच्या प्रवासादरम्यान नर्मदा शहरानजीक कार-ट्रकच्या भीषण अपघातातराहाता नगर जिल्ह्यातील तिघांचा तर औरंगाबाद येथील एकाचा  दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली.नंदकिशोर संपत निर्मळ (वय २८) गोरक्षनाथ एकनाथ घोरपडे (वय ६३, दोघेही रा.पिंपरी निर्मळ ता.राहाता), प्रवीण सारंगधर शिरसाठ (रा.कोल्हार खुर्द, ता.राहुरी) किशोर रायभान कोल्हे (रा.नांदगाव, जि.औरंगाबाद ) असे या अपघातात मृत्यू पावलेल्या चौघांची नावे आहेत.अपघातात मृत्यू पावलेले हे चौघेही एकमेकांचे नातलग आणि मित्र आहेत.  ते शनिवारी (दि.२२) दुपारी पिंपरी निर्मळ येथून इर्टीका मोटारीने (एम.एच.१७, ए झेड.-४५७) गुजरात येथील कुबेर या देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी गेलेले होते. दर्शन आटोपून रविवारी (दि.२३) दुपारी ते परतीच्या प्रवासात असताना   नर्मदा शहरानजीक रस्त्यावर कार व  ट्रकची समोरासमोर धडक झाली. यातच या चौघांमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जणांचा गुजरातमधील राजपिपला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातासंदर्भात गुजरातमधील नर्मदा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. दरम्यान या अपघाताचे बातमी पिंपरी निर्मळ व कोल्हार खुर्द येथे समजताच या दोन्हीही गावात शोककळा पसरली. तर मृताच्या नातेवाईकांनी गुजरातच्या दिशेने धाव घेतली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGujaratगुजरातAccidentअपघातrahaataराहाता