संगमनेर (जि. अहमदनगर) : लुटण्याच्या हेतूने चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी सराफावर गोळीबार केला. या घटनेत जखमी झालेल्या अविनाश शर्मा यांची प्रकृती चिंताजनक असून, सुवर्णकार ज्ञानेश्वर चिंतामणी किरकोळ जखमी झाले आहेत. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गोळीबार करत त्याच वाहनातील दुसऱ्या व्यक्तीलाही लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावच्या शिवारातील आदर्श नगर येथे संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांनी सराफाकडून लुटलेले सोन्या चांदीचे दागिने व रोकड घेऊन पोबारा केला.
लुटण्याच्या हेतूने चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी सराफावर केला गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:43 IST