शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

चार चिमुकल्यांचा विजेच्या धक्क्याने ओढवला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 06:26 IST

खंदरमाळ परिसरात वादळाने तुटलेल्या तारेचा विद्युत प्रवाह नाल्याच्या पाण्यात उतरला.

लोकमत न्यूज नेटवर्क घारगाव (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील (येठेवाडी) खंदरमाळ परिसरात वादळाने तुटलेल्या तारेचा विद्युत प्रवाह नाल्याच्या पाण्यात उतरला. या नाल्यात आंघाेळीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.

दर्शन अजित बर्डे (८), विराज अजित बर्डे (६), अनिकेत अरुण बर्डे (१२), ओंकार अरुण बर्डे (१०) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. ही मुले आदिवासी कुटुंबातील असून, घरची परिस्थिती बिकट आहे. दर्शन, विराज, अनिकेत, ओंकार हे येठेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकत होते. मुले शाळेत गेल्यानंतर आई-वडील मजुरीच्या कामावर निघून गेले होते. नंतर मुले वांदरकडा येथील छोट्याशा नाल्यात आंघोळीसाठी गेली असता याच नाल्याच्यावरुन गेलेली वीजवाहक तार तुटून पाण्यात पडलेली होती. हे मुलांच्या लक्षात आली नाही. पाण्यात उतरल्यानंतर वीजेचा शॉक लागून या चारही मुलांचा मृत्यू झाला. 

झोळीतून नेले मृतदेहnपावसामुळे रस्ता खराब झाल्याने रुग्णवाहिका घटनास्थळापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे चारही मृतदेह झोळीच्या माध्यमातून तरुणांनी रुग्णवाहिकेपर्यंत नेले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. nनाल्यात वीजवाहक तार तुटून पडल्याबाबत महावितरणला कळविले होते. मात्र, महावितरणने तात्काळ दखल न घेतल्याने या चिमुकल्यांचा बळी गेला, अशी चर्चा होती. दरम्यान, येथील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र, कोणीतरी हा वीजपुरवठा सुरु केला, असा खुलासा महावितरणने केला आहे.