शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याने चौघांवर गुन्हा; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला अखेर यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 05:47 IST

नगरच्या रुग्णालयातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह अनेकांनी बनावट प्रमाणपत्र काढली आहेत.

अहमदनगर : नगर जिल्हा रुग्णालयाचा लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून शासकीय पोर्टलवर खोटी माहिती अपलोड करत चारजणांनी दिव्यांगांची बनावट प्रमाणपत्र घेतल्याचे उघड झाल्याने या चौघांसह जिल्हा रुग्णालयातील अज्ञात कर्मचाऱ्यांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल झाला आहे.

‘लोकमत’ गत महिन्यापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साहेबराव डवरे यांनी याबाबत येथील तोफखाना पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. या फिर्यादीवरून सागर भानुदास केकाण, प्रसाद संजय बडे, सुदर्शन शंकर बडे व गणेश रघुनाथ पाखरे (सर्व रा. पाथर्डी तालुका, जि. अहमदनगर) यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

पूजा खेडकरनंतर नवा घोटाळाबडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिने नगरच्या जिल्हा रुग्णालयातूनच दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले आहे. ‘लोकमत’ने खेडकरच्या प्रमाणपत्राची माहिती रुग्णालयाकडे मागितली. मात्र, रुग्णालय ही माहिती देण्यास तयार नाही. नगरच्या रुग्णालयातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह अनेकांनी बनावट प्रमाणपत्र काढली आहेत. रुग्णालयाने आजवर दिलेल्या सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी करा, अशी मागणी अनेक संघटनांनी येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्याकडे केली आहे. मात्र, घोगरे यांनी याबाबत काहीही निर्णय अद्याप घेतलेला नाही. अशा तपासणीतून मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीias pooja khedkarपूजा खेडकर