शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंना सोयी-सुविधा निर्माण करण्याची पायाभरणी शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:23 IST

वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र रायफल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र एअर ॲण्ड फायर आर्म राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी आमदार ...

वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र रायफल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र एअर ॲण्ड फायर आर्म राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी डॉ. मरियम माजिद, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, अहमदनगर शूटिंग क्लबचे अध्यक्ष तथा उपरसपंच भारत काळे, उपाध्यक्षा सुनीता काळे, शशिकांत पाचारणे, सोसायटी चेअरमन सतीश काळे, क्रीडा अधिकारी दीपाली बोडखे, सहसचिव प्रवीण लिपणे, न्यायाधीश प्रवीण चुत्तर, एमआरए पंच विराज सेलेटकर, पंच छबूराव काळे, राष्ट्रवादी क्रीडा सेलचे घनश्याम सानप, सायकलिंग असोसिएशनचे संजय साठे, प्रशांत बागडे, सुशीलकुमार नागपुरे, संजय पाटेकर, राजश्री पाटील, फटांगरे, विठ्ठलप्रसाद तिवारी, संजय आगरकर, आदींसह खेळाडू व पालक उपस्थित होते.

पुढे जगताप म्हणाले की, एअर रायफल शूटिंग हा खेळ सध्या लोकप्रिय होत आहे. खेळाची आधुनिक साधनसामग्री व शूटिंग रेंज उपलब्ध नसल्याने खेळाडूंना मोठ्या शहरात जावे लागते. मात्र, सध्या शहरात या खेळाची व्यवस्था झाल्याने अनेक खेळाडू पुढे येऊन नॅशनल स्पर्धेपर्यंत मजल मारत आहेत. नेमबाजी करताना खेळाडूची मानसिक एकाग्रतादेखील वाढीस लागते.

प्रास्ताविकात भारत काळे यांनी शहरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धा होत असून, या क्रीडा प्रकारात शहरासह ग्रामीण भागातील खेळाडू पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अभिजित दळवी, धनंजय कारंडे, संजय आगरकर, कृष्णा काळे, भारत पवार, नितीन बोधले, राहुल कदम, अलीम शेख, ऋषिकेश दरंदले, आदी उपस्थित होते. वीणा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. छबूराव काळे यांनी आभार मानले.

---------------

फोटो - २८शूटिंग

वाडियापार्क क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र रायफल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र एअर ॲण्ड फायर आर्म राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे, डॉ. मरियम माजिद, प्रा. माणिक विधाते, भारत काळे, आदी उपस्थित होते.