शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार राजीव राजळे पंचतत्वात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 16:59 IST

राजळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील समर्थकांची कासार पिंपळगावकडे रीघ लागली. रविवारी सकाळी मुंबईहून त्यांचे पार्थिव सिद्धसावली या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले.

तिसगाव (अहमदनगर) : पाथर्डी तालुक्याचे सुपुत्र लोकनेते उत्कृष्ट संसदपटू माजी आमदार राजीव राजळे यांच्यावर कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणात लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात रविवारी (३. ३० वा.) अंत्यसंस्कार करण्यात आले.राजळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील समर्थकांची कासार पिंपळगावकडे रीघ लागली. रविवारी सकाळी मुंबईहून त्यांचे पार्थिव सिद्धसावली या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. अश्रू अनावर झाल्याने अनेकांना मूर्च्छा आली. जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातील मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. तिसगाव, पाथर्डी, शेवगाव व पंचक्रोशीतील गावात बंद पाळण्यात आला. कासार पिंपळगावात चुलबंद ठेवून राजळेंना आदरांजली वाहण्यात आली. तिसगाव-शेवगाव-पैठण राज्यमार्गावर ‘राजाभाऊ परत या, राजीव राजळे अमर रहे, असेन मी नसेन मी कर्तृत्वातून दिसेन मी’, अशा घोषवाक्याचे फ्लेक्स लावून विविध संस्था व व्यक्तिगत पातळीवर श्रद्धाजली अर्पण करण्यात आली. दुपारी दोन वाजेदरम्यान हार फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून राजाभाऊंची अंत्ययात्रा वृद्धेश्वर कारखानामार्गे शेवगाव रोडने टाळ मृदंगाच्या गजरात निघाली. ठीक ३.३० वाजता त्यांचे जेष्ठ सुपुत्र कृष्णा व कनिष्ठ बंधु राहुल यांनी राजाभाऊंच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्यानंतर तेथेच शोकसभा झाली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंढे, पालकमंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे आ. सुधीर तांबे, जि. प. सदस्या हर्षदा काकडे, कामगार नेते नितीन पवार, तारकेश्वर गडाचे महंत आदीनाथ महाराज शास्री, अशोक महाराज कर्डिले, वैभव पिचड, केदारेश्वरचे अध्यक्ष प्रताप ढाकणे, राजेंद्र नागवडे, रिपाइंचे अशोक गायकवाड, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाप्पूसाहेब भोसले, अभय आव्हाड, मृत्युंजय गर्जे, शिवाजी गाडे, नगरसेवक योगीराज गाडे, बबनराव पाचपुते, दादापाटील शेळके आदींची श्रद्धांजली वाहिली़ पैठण येथील राजेंद्र मांडे गुरुजी, संजुदेवा मुळे व त्यांच्या सहका-यांनी यमसुक्ताचे पठन करून मंत्राग्नीची कार्यपूर्ती केली.