शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

कृषी विद्यापीठाची जागा माजी नगरसेवकाने गिळली? तहसीलदारांना पत्र; अतिक्रमण तातडीने काढून देण्याची मागणी 

By शिवाजी पवार | Updated: July 31, 2023 19:19 IST

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या श्रीरामपूर येथील फळपिके संशोधन प्रकल्पाच्या जागेवर माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुंबीयांनी अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या श्रीरामपूर येथील फळपिके संशोधन प्रकल्पाच्या जागेवर माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुंबीयांनी अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने तहसीलदारांकडे अतिक्रमण काढून देण्यासाठी तातडीने पत्र पाठविले असून त्यावर कारवाई सुरू झाली आहे.

शहरातील जुने तहसील कार्यालयाजवळ विद्यापीठाच्या संशोधन प्रकल्पाची ही जागा आहे. त्यावर राजेश अलघ व अन्य चार जणांनी अतिक्रमण केले असून ते काढून द्यावे, अशी मागणी अशी विद्यापीठाच्या वतीने तहसीलदार व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाच्या फळपिक संशोधन प्रकल्पाच्या ४६० (१) जमिनीवर माजी नगरसेवक राजेश अलग यांनी १५ जुलै २०२३ या दिवशी नवीन तारेचे कूंपन केले. विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकारी यांनी अतिक्रमणाचे काम थांबविले होते. मात्र राजेश अलग, सारिका राजेश अलग, प्रविण हरिराम अलग, प्रशांत हरिराम अलग, अक्षय प्रशांत अलघ यांनी ११ जुलै या दिवशी कार्यालयीन वेळेनंतर विद्यापीठाच्या मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण केले. तेथे जय माता दी मित्र मंडळ असा फलक लावला, असे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे.

तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण ताबडतोब काढावे, अशी मागणी करण्यात आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची श्रीरामपूर शहरात जागा आहे. सदर जागेवर लोकांनी अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात नगरपालिकेला पत्र पाठवून अतिक्रमण काढून जागा विद्यापीठाच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी केलेली आहे.विठ्ठल शिर्के, महात्मा कृषी विद्यापीठ, राहुरी मंडल अधिकार्यांना जागेची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व कागदपत्रांची पाहणी करून उचित कार्यवाही केली जाणार आहे. मिलिंद वाघ, तहसीलदार, श्रीरामपूर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी