शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 15:21 IST

अहमदनगर : मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष संभाजीराव म्हसे यांचे औरंगाबाद येथे रविवारी पहाटे ...

अहमदनगर : मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष संभाजीराव म्हसे यांचे औरंगाबाद येथे रविवारी पहाटे आजारपणाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुली आहेत. अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकारी दीपलक्ष्मी म्हसे यांचे ते पती, औरंगाबाद खंडपीठातील अ‍ॅड. माधवेश्वरी व पुणे येथील आर्किटेक्ट राजेश्वरी यांचे ते वडिल होत.राहुरी तालुक्यातील कोंढवड या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या म्हसे यांनी १४ जुलै १९७१ रोजी वकिली व्यवसायाची सनद मिळवली. वकिली व्यवसाय करताना म्हसे यांनी मंडळ अधिकारी न्यायाधिकरणापासून ते जिल्हा न्यायालय, सहकार न्यायालय, कामगार न्यायालय, मंत्रालयातील विविध न्यायाधिकरणे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशा विविध पदांवर यशस्वी कारकीर्द गाजविली. कमाल जमिन धारण कायद्यातील सुधारणा, निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावण अशा विविध महत्वाच्या न्यायप्रक्रियांमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. दिवंगत बाळासाहेब विखे पाटील विरुद्ध यशवंतराव गडाख यांच्यातील देशभर गाजलेल्या खटल्यात म्हसे यांनी बुद्धीचातुर्य व ज्ञानाची चुणूक दाखविली. त्यामुळेच निवडणूक आचारसंहितेत मोठे फेरबदल करण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणून १६ एप्रिल १९९६ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी २००९ पर्यंत काम पाहिले. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष म्हणून जवळपास दोन ते तीन वर्षे काम पाहिले़ प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी अहमदनगर येथे पुन्हा परतण्याचा निर्णय घेतला़ मात्र, राज्य शासनालासुद्धा त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग करून घ्यावासा वाटला व म्हणूनच जानेवारी २०१७ मध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी तीन वर्षासाठी त्यांची नेमणूक केली होती.