शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रांकडून युरियासाठी इतर खते, औषधांची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 15:37 IST

पिकांना खते मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कृषी सेवा केंद्रांसमोर तासन्तास रांगा लावूनही युरिया खताची एक अथवा दोन गोण्या मिळत आहेत. मात्र, युरियासोबत इतर खते किंवा औषधे घेण्याची सक्ती केली जात आहे.

मधु ओझा । 

पुणतांबा : राहाता तालुक्यातील पुणतांबा परिसरात यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झाले. शेतक-यांनी उत्साहात पेरणी केली. मात्र पिकांना खते मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. कृषी सेवा केंद्रांसमोर तासन्तास रांगा लावूनही युरिया खताची एक अथवा दोन गोण्या मिळत आहेत. मात्र, युरियासोबत इतर खते किंवा औषधे घेण्याची सक्ती केली जात आहे.

युरियाचा तुटवडा भासणार नसल्याचे सरकारकडून सांगितले जात असले तरी ग्रामीण भागात युरिया सहजासहजी मिळत नाही. कृषी सेवा केंद्रात फक्त १२० ते १५० युरियाच्या गोण्या येत आहेत. पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने वाटप कसे करावे, याचा प्रश्न केंद्रचालकांना पडला आहे. खतांबरोबर इतरही माल दुकानदारांना घ्यावा लागत आहे. युरिया खरेदी करणारा शेतकरी इतर माल घेण्याचे नाकारत आहे. त्यामुळे शेतकरी-कृषी सेवा केंद्र चालक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत.

युरियाच्या पुरवठ्याकडे अहमदनगर जिल्हा पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे. पुणतांबा येथील कृषी सेवा केंद्राच्या शिल्लक मालाची तपासणी आणि चौकशी वरिष्ठ अधिका-यांकडून होणे गरजेचे आहे.         - नामदेवराव धनवटे, संचालक, पुण्यस्तंभ शेतकरी गट.

युरियाचा साठा कमी येत असल्याने मालाचा तुडवडा जाणवत आहे. पुरवठा कमी व मागणी वाढल्याने प्रत्येक आधारवर एक गोणी खताचे नियोजन केले आहे.

 -किरण धुमाळ, कृषी अधिकारी, पुणतांबा.

दरवर्षी राज्यातील युरियाची किती मागणी असते हे सरकारला माहिती असते. शेतक-यांची मागणी आगाऊ नोंदवून गावपातळीवर पुरवठा करावा. 

-विनोद धनवटे, सचिव, पाणलोट समिती पुणतांबा.     

टॅग्स :AhmednagarअहमदनगरrahaataराहाताAgriculture Sectorशेती क्षेत्र