शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

उड्डाणपुलाच्या प्रस्तावाचा खेळखंडोबा

By admin | Updated: February 3, 2015 17:27 IST

जुना प्रस्ताव गुंडाळून ठेवत डीएसपी चौकापर्यंत उड्डाणपूल उभारण्याच्या नव्या प्रस्तावावर सोमवारी पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

 अहमदनगर : जुना प्रस्ताव गुंडाळून ठेवत डीएसपी चौकापर्यंत उड्डाणपूल उभारण्याच्या नव्या प्रस्तावावर सोमवारी पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. एकाच पुलाचे तीन नवीन प्रस्ताव यानिमित्ताने समोर आले आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाचे उड्डाण प्रस्तावांच्या 'खेळ'खंडोब्यात अधिकच लांबणारे, हे यानिमित्ताने समोर आले आहे. गेल्या सात वर्षांपासून शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम रेंगाळले आहे. भूसंपादनास विलंब झाल्याने पुलाचा खर्च ८८ कोटी २३ लाखांवर गेला आहे. विकासकाने पूर्वीच्या दराने काम करण्यास नकार देत न्यायालयात धाव घेतली. त्यावर लवाद नेमण्यात आला. प्रशासन व विकासकातील वाद सध्या लवादासमोर आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी दुपारी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीनंतर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना नव्या प्रस्तावाची माहिती दिली. उड्डाणपुलाचे काम विकासकाने केले नाही. त्याबदल्यात टोल वसुलीचा कालावधी कमी करून पुलाचा नवीन अद्ययावत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पूर्वी हा पूल अक्षता गार्डन ते कोठीपर्यंतच र्मयादित होता. तो आता जिल्हा पोलीस अधीक्षक चौकापर्यंत आणला जाणार असून, त्यासाठीचे तीन वेगवेगळे प्रस्ताव तयार आहेत. अक्षता गार्डन ते डिएसपी चौकापर्यंतच्या चौपदरी पुलाचा सुमारे ७४0 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याशिवाय दुपदरीकरणाचे दोन प्रस्ताव आहेत. त्यामध्ये डिएसपी चौकापर्यंतच्या दुपदरी पुलाचा सुमारे ३७0 कोटी खर्चाचा प्रस्ताव आहे. तर अक्षता गार्डन ते जुने पाटील हॉस्पिटलपर्यंतच्या दुपदरी पुलाचा सुमारे २0५ कोटींचा आराखडा तयार केला गेला आहे. या तिन्हीही प्रस्तावावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात येत्या गुरुवारी बैठक होत आहे. शहरातील वाहतुकीत भविष्यात वाढ होणार आहे. सुपा आणि घोडेगाव येथील औद्योगिक वसाहतीचाही विकास होईल. शहराची भविष्याची गरज लक्षात घेऊन उड्डाणपुलाची लांबी वाढविण्यात आली आहे. त्यासाठी लागणार्‍या निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी

>नगर शहरातून जाणारे महामार्ग चार पदरी आहेत. महामार्गावरील अतिक्रमणे काढून ते सहापदरी करावेत, जेणे करून वाहतूक सुरळीत होऊन अपघात होणार नाही, याबाबत खा. दिलीप गांधी यांनी आढावा बैठकीत सूचना केल्या. प्रशासनाच्या कारभारावर टीका करत, काम करा निधीचे आम्ही पाहतो, असे खा.गांधी यावेळी म्हणाले.