साईबाबांच्या निर्वाणानंतर काही वर्षांनी काकासाहेब दीक्षितांच्या पुढाकारातून व संत दासगणू यांच्या अध्यक्षतेखाली साईसंस्थानची स्थापना झाली. १३ फेब्रुवारी, १९२२ रोजी नगरच्या न्यायालयाने संस्थानच्या घटनेला मान्यता दिली.
१३ फेब्रुवारी रोजी या घटनेचा ९९वा वर्धापन दिन होता, तर १४ फेब्रुवारी, २०२१ ते १३ फेब्रुवारी, २०२२ दरम्यान या ऐतिहासिक घटनेचे शताब्दी वर्ष असणार आहे. साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या पुढाकारातून गेले दोन दिवस साईमंदिर परिसरात व जवळपास प्रत्येक मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, अभियंता रघुनाथ आहेर आदींसह विविध विभागांच्या प्रमुखांनी या ऐतिहासिक क्षणांना सुवर्ण क्षण बनविण्यासाठी प्रयत्न केले.
( १४ शिर्डी)