शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी नगर जिल्ह्यातील पाच तालुक्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 17:16 IST

पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणा-या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यंदा प्रथमच नगर जिल्ह्याला संधी मिळाली असून, नगर जिल्ह्यातील पाच तालुक्यांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणा-या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यंदा प्रथमच नगर जिल्ह्याला संधी मिळालीनगर जिल्ह्यातील पाच तालुक्यांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता अमीर खान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन जिल्हाधिका-यांना याबाबत सुचना दिल्या.

अहमदनगर : पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणा-या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यंदा प्रथमच नगर जिल्ह्याला संधी मिळाली असून, नगर जिल्ह्यातील पाच तालुक्यांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. बुधवारी पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता अमीर खान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन जिल्हाधिका-यांना याबाबत सुचना दिल्या.नगर जिल्ह्यातील दुष्काळी पाथर्डी, जामखेड, कर्जत, नगर आणि पारनेर तालुक्यांची ‘सत्यमेव जयते वाटर कप - २०१८’ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा ठराव डिसेंबर अखेरीस पाठविण्याचे आवाहन केले आहे. या स्पर्धेत जलसंधारण आणि पाणीलोट व्यवस्थापन यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणा-या गावाला दहा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या योजनेत शेततळे, नदीजोड प्रकल्प, यंत्राद्वारे पाणी अडवा, पाणी जिरवा अभियान, बंधारे, शौचालये, स्वच्छता आदी कामे तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी पाणी फाऊंडेशनने या पाचही तालुक्यात समन्वयकांची नेमणूक केली आहे.

स्पर्धेतील सहभागाच्या अटी

ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलावून वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचा ठराव करणे आवश्यक आहे़ पाणलोट व्यवस्थापनाविषयी ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यासाठी पाणी फाऊंडेशन चार दिवसीय शिबिर घेणार आहे. त्यात ग्रामपंचायतीने ५ जबाबदार ग्रामस्थांना पाठविणे आवश्यक आहे. या पाच जणांमध्ये दोन महिला व दोन तरुण आवश्यक आहेत. यातील किमान एकाला स्मार्ट फोन चांगल्या पद्धतीने आॅपरेट करता येणे आवश्यक आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAamir Khanआमिर खानDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस