शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यात पाच दुकाने फोडली; चोरटे सीसीटिव्हीत कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 17:23 IST

श्रीगोंदा शहरातील झेंडा चौकातील अजय जीन्स गॅलरी, कटारिया कलेक्शन, गायत्री मोबाईल शॉपी, आनंद मेडिकल या पाच दुकानात मंगळवारी रात्री चोरी झाली. 

श्रीगोंदा : शहरातील झेंडा चौकातील अजय जीन्स गॅलरी, कटारिया कलेक्शन, गायत्री मोबाईल शॉपी, आनंद मेडिकल या पाच दुकानात मंगळवारी रात्री चोरी झाली. यामध्ये ४३ हजार ३०० रूपयांचे वेगवेगळे साहित्य, रक्कम चोरीस गेली. नागवडे पब्लिक स्कूलमध्ये ही लॅपटॉप, साउंड सिस्टीम चोरीस गेली. या प्रकरणी प्रतीक भाऊसाहेब घाटे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला. शहरातील झेंडा चौक परिसर ही मोठी बाजारपेठ आहे. येथे मोबाईल, ज्वेलरी, मिठाई, कपड्यांची मोठमोठी दुकाने आहेत. मंगळवारी मध्यरात्री येथील पाच दुकानांमध्ये चोरी झाली. बुरूड गल्ली येथील सागर देशपांडे यांनी प्रतीक घाटे यांना दुकानाची कडी, शटर तुटली असल्याचे सांगितले. त्यानंतर येथील दुकानांमध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अजय जीन्स गॅलरीमधून २९ हजार ६०० रूपयांचे कपडे, कटारिया कलेक्शन या आनंद कटारिया यांच्या दुकानातून ९ हजार ५०० रूपयांचे कपडे, स्वप्नील चव्हाण यांच्या गायत्री मोबाईलमधून ४ हजाराची रोकड, साहेबराव खेतमाळीस यांच्या आनंद मेडिकल शॉपमधून ५०० रूपयांची रोकड असे एकूण ४३ हजार ३०० रूपये रोकड व साहित्य चोरीस गेले आहे. त्यानंतर नागवडे पब्लिक स्कूलच्या आॅफीसचे कुलूप तोडून एक लॅपटॉप व साऊंड सिस्टीम चोरून नेली. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी भेट दिली. काही धागेदोरे मिळावेत यासाठी आलेले श्वानपथकही गावातच घुटमळले. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. ते २० ते २२ वयोगटातील असून त्यांनी तोंडाला रूमाल बांधलेले होते. त्यामुळे त्यांचे चेहरे ओळखू येत नाही.

टॅग्स :theftचोरीShrigondaश्रीगोंदा