शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीतील पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 10:15 IST

खडका फाटा ते सलाबतपूर रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना नेवासा पोलिसांनी रंगेहात पकडले.

नेवासा : खडका फाटा ते सलाबतपूर रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना नेवासा पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून दरोड्याच्या साहित्यासह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.अटकेमध्ये सुजित भिकन देवकुळे (वय २६ रा.हरेगाव ता.श्रीरामपूर), संदीप एकनाथ ढगे (वय २६ रा.खोकर ता.श्रीरामपूर), रोहन विलास शिंदे (वय २५, रा.पंचशीलनगर, चाळीसगाव), अभिजित मधुकर जोंधळे (वय २५, रा.संगमनेर रोड श्रीरामपूर), दीपक बाबासाहेब शेटे (वय २३, रा.संजयनगर, श्रीरामपूर) यांचा समावेश आहे.नेवासा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांना सलाबतपूर रोडवर कारनजीक चार ते पाच जण चोरीच्या हेतूने बसल्याची माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे घटनास्थळी गेले असता सलाबतपूर रोडवरील आडवी चारीनजीक कार दिसून आली. कारनजीक पाच जणांच्या संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे चॉपर, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, दोऱ्या, सुतळी अ‍ॅटमबॉम्ब, डिझेल ड्रम, दोन मोबाईल, कार, कारमध्ये नंबर प्लेट व पाच मास्कसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर टोळीकडून भविष्यात घडणा-या अनेक गुन्ह्यांवर प्रतिबंध बसणार असून त्यांच्याकडून आणखी गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोर्डे यांच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा