शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
2
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
3
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
4
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
5
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा
6
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
7
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
8
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
9
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
10
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
11
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
12
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
13
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
14
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
15
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
16
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
17
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
18
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
19
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
20
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या

श्रीगोंद्यात नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 15:20 IST

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना श्रीगोंदा शहराच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यासह पाच नगरसेवकांनी शनिवारी दुपारी भाजपात प्रवेश केला. 

श्रीगोंदा : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना श्रीगोंदा शहराच्या नगराध्यक्षा शुभांगी पोटे, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यासह पाच नगरसेवकांनी शनिवारी दुपारी भाजपात प्रवेश केला. माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानी बबनराव पाचपुते, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, भगवानराव पाचपुते, प्रा.तुकाराम दरेकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, बापू गोरे, सुनील जंगले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजेंद्र नागवडे यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर पाचपुते यांच्या प्रचारात नागवडे समर्थक सक्रीय झाले आहेत. पोटे दापत्यांबरोबर नगरसेविका सीमा गोरे, संगीता मखरे, राजेंद्र लोखंडे, एस.पी.कोंथिबीरे यांनी भाजपात प्रवेश केला. मनोहर पोटे हे पाचपुते यांचे खंद्दे समर्थक. पण पाचपुते हे आपणास नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देणार नाहीय. त्यामुळे शुभांगी पोटे व मनोहर पोटे, सतिश मखरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नगराध्यक्षपदी शुभांगी पोटे यांनी भाजपाच्या सुनीता शिंदे यांचा पराभव केला होता. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात पुन्हा मनोहर पोटे व त्यांचे सहकारी भाजपमध्ये परतले आहेत. याप्रवेशामुळे भाजपला आणखी बळ मिळणार आहे. राजेंद्र नागवडे यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी आपण भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीगोंदा शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून स्वगृही परतलो आहे, असे माजी नगराध्यक्षा मनोहर पोटे यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019