अहमदनगर : जिल्हा परिषद आणि राज्य सरकारच्या कृषी विभागातील पाच अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. राज्य सरकारच्या कृषी विभागाच्यावतीने याबाबतचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत. यात तीन विनंती आणि दोन प्रशासकीय बदल्यांचा समावेश आहे. बदली झालेल्या कर्मचार्यांत उपविभागीय तंत्र अधिकारी आर. आर. केकाण यांची पुणे येथे लाभक्षेत्र प्राधिकरण विभागात, सुखदेव दगडखैरे यांची बीडच्या जिल्हा कृषी अधीक्षक पदावर, दत्तू राऊत जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी यांची उपविभागीय अधिकारी कृषी अधीक्षक कार्यालय येथे, जिल्हा परिषद विशेष घटक योजनेचे कृषी अधिकारी विष्णू साळवे यांची श्रीरामपूर येथे तालुका कृषी अधिकारी पदावर, विजय पंडित तालुका विकास अधिकारी यांची साळवे यांच्या जागेवर बदली झालेली आहे. बदली झालेल्यांमध्ये दोघांची जिल्ह्याबाहेर तर इतरांची जिल्ह्यातच बदली झाली आहे़ (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील पाच कृषी अधिकार्यांच्या बदल्या
By admin | Updated: June 3, 2014 00:26 IST