शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी तालुक्यातील मुळा धरणातील मच्छिमारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 13:23 IST

मुळा धरणातील माशांवर विषप्रयोग या मथळ्याखाली बुधवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून या वृत्ताची दखल घेण्यात आली असून, जिल्हा पोलीस प्रमुखांना कारवाईचा आदेश देण्यात आला आहे. बुधवारी दुपारी पाटबंधारे खात्याने राहुरी पोलीस स्टेशनला पत्र देऊन पोलीस संरक्षणाची मागणी केल्याची माहिती मुळा धरण क्षेत्राचे अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली. 

ठळक मुद्दे जिल्हा पोलीस प्रमुखांना कारवाईचा आदेशपाटबंधारे खात्याने केली पोलीस संरक्षणाची मागणी

राहुरी : मुळा धरणातील माशांवर विषप्रयोग या मथळ्याखाली बुधवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून या वृत्ताची दखल घेण्यात आली असून, जिल्हा पोलीस प्रमुखांना कारवाईचा आदेश देण्यात आला आहे. बुधवारी दुपारी पाटबंधारे खात्याने राहुरी पोलीस स्टेशनला पत्र देऊन पोलीस संरक्षणाची मागणी केल्याची माहिती मुळा धरण क्षेत्राचे अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली. मुळा धरणामध्ये मध्यरात्री विषारी औषध टाकून मच्छिमारी होते. पाणी विषारी करणारे नेमके नेमके कोण आहेत, यादृष्टीने तपास सुरू आहे़ जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी बुधवारी दुपारी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना मोबाईलवरून चौकशी करून कारवाईचा आदेश दिला आहे.मुंबई येथील ब्रीज फिशरीचे मोहमंद खान यांनी मुळा धरणातील माशाचा ठेका घेतला आहे़ ठेकेदार व मच्छिमारी करणारे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. विषारी औषधांमुळे मच्छिमारी केल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ यासंदर्भात ठेकेदाराने मच्छिमारी करणाऱ्यांना मासेमारी जाळे पध्दतीने करावी, माशांवर विषप्रयोग करू नये, असा सज्जड इशारा दिला आहे़ त्यानंतर काही अवैध मच्छिमारांनी रात्रीच्या वेळी धरणात विष टाकून मच्छिमारी करण्याचा अघोरी प्रयोग केला आहे़ अघोरी मच्छिमारी करणाºयांनी मुळा धरणात असलेले कर्मचाºयांचे शेड उद्ध्वस्त केल्याचे समोर आले आहे़मुळा धरणावर अवैध व्यवसाय करणाºयांनी अतिक्रमण केले आहे़ अयोग्य पद्धतीने मच्छिमारी होत असल्याचे आढळून आले आहे़ धरणाच्या काठावर घरे बांधून बेकायदेशीर मच्छिमारी करणा-यांवर पाटबंधारे खात्याने कारवाई करण्याची गरज आहे़ मुळानगर परिसरात कुणीही येऊन राहत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे़ धरण परिसरात येणाºया पर्यटकांनाही लुटमार करण्याचे प्रकार वाढल्याने संरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे़. मुळा पाटबंधारे विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याचे सांगितले जाते. अनेक कर्मचारी निवृत्त झालेले आहेत़ त्यामुळे धरणाच्या ५० किलोमीटर परिसरात संरक्षण करणे पाटबंधारे खात्याच्या आवाक्याबाहेर आहे़ पोलीस संरक्षण मागण्यात आले असले, तरी पोलिसांची संख्याही कमी आहे़ त्यामुळे विषारी पद्धतीने होणारी मच्छिमारी कशी रोखणार? हा कळीचा मुद्दा पुढे आला आहे़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी