शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

आधी कोरोनाशी लढला, त्याचा निष्प्राण देह असा रस्त्यावर पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:02 IST

अहमदनगर : आधी कोरोनाशी लढला....लढता लढता मृत्यू झाला आणि त्याचा निष्प्राण देह असा रस्त्यावर पडला. नगरमध्ये जिल्हा रुग्णालयासमोरच ही घटना अनेक नागरिकांच्या समोरच घडली.

अहमदनगर : आधी कोरोनाशी लढला....लढता लढता मृत्यू झाला आणि त्याचा निष्प्राण देह असा रस्त्यावर पडला. नगरमध्ये जिल्हा रुग्णालयासमोरच ही घटना अनेक नागरिकांच्या समोरच घडली.

कोरोनाच्या महामारीत आरोग्य यंत्रणेच्या बेफिकरीने कळस गाठला आहे. अत्यंविधीसाठी नेत असलेला मृतदेह चालत्या वाहनातून रस्त्यावर पडला़ प्रत्यक्षदर्शींनी वाहनचालकाला थांबवून माहिती दिल्यानंतर घाईघाईत दोघांनी येऊन रस्त्यावर पडलेला मृतदेह उचलला़ नगरच्या जिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर हा प्रकार मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला.

येथील जिल्हा रुग्णालयातून महापालिकेची रुग्णवाहिका (एमएच-१६, टी-१८१) मृतदेह घेऊन निघाली़ जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशव्दारातून ही रुग्णवाहिका बाहेर पडली़ तेथून पुढे हाकेच्या अंतरावर गेल्यानंतर रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरसह मृतदेह खाली पडला़ स्ट्रेचरवरून मृतदेह रस्त्यावर पडल्याने रस्त्यावर ये-जा करणारे घाबरून गेले़ काहींनी वाहनचालकाला थांबवून ही माहिती दिली़ मृतदेह खाली पडल्याची माहिती मिळाल्यानंतर वाहनचालकासह गाडीतून दोघे उतरले़ त्यांनी रस्त्यावर पडलेला मृतदेह उचलून पुन्हा वाहनात ठेवला. हा मृतदेह प्लास्टिकमध्ये बांधलेला होता़ ही घटना घडल्याने या रस्त्यावर भाजी-फळे विक्रेत्यांमध्ये भितीचे वातावरण झाले. 

हा मृतदेह नेमका कोविड बाधित होता की,बेवारस, याबाबत माहिती मिळू शकली नाही़ मात्र हा मृतदेह प्लास्टिकमध्ये पॅकबंद करण्यात आला होता. तसेच महापालिकेने ज्यांना कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम दिले  आहे, त्यांच्याकडूनच हा प्रकार घडला. त्यामुळे सदरचा मृतदेह हा कोरोनाबाधिताचा होता, याला पुष्टी मिळते. महापालिकेने बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीचा ठेका खासगी संस्थेला दिला आहे़ याच व्यक्तीला कोरोना रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचेही काम सोपविण्यात आलेले आहे. त्यामुळे याच संस्थेने हा मृतदेह अंत्यविधीसाठी चालविला होता, अशी माहिती आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या