शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा गोळीबार, मद्यधुंद शिक्षकाने भावावर झाडली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 21:07 IST

जामखेड, केडगाव येथील गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच आता पाथर्डी तालुक्यातही गोळीबाराची घटना घडली आहे. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून मद्यधुंद शिक्षकाने भावावरच गोळीबार केला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथे घडली.

पाथर्डी (अहमदनगर) : जामखेड, केडगाव येथील गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच आता पाथर्डी तालुक्यातही गोळीबाराची घटना घडली आहे. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून मद्यधुंद शिक्षकाने भावावरच गोळीबार केला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथे घडली.गोळीबार करणारा शिक्षक उद्धव कोंडीराम मरकड (रा. निवडूंगे) याच्यासह त्याची पुतणी पुष्पा पानसरे यांना पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे. उद्धव कोंडीराम मरकड (रा. निवडूंगे), बाळासाहेब कोंडीराम मरकड व शांता भाऊसाहेब दहातोंडे हे सख्खे बहिण-भाऊ आहेत. शांता ही नगर येथे राहते तर उद्धव व बाळासाहेब हे निवडूंगे येथे शेजारी राहतात. उद्धव हा पाथर्डी तालुक्यातील कडगाव येथे शिक्षक आहे.एक महिन्यापूर्वी उद्धव याने नगर येथील बहिण शांता हिच्या घरी जावून वाद घातला होता. ९ मे रोजी तिसगाव येथे नातेवाइकाच्या लग्नासाठी शांता आली होती. त्यावेळी ती निवडंगे येथे भाऊ बाळासाहेब यांच्याकडे मुक्कामी थांबली होती. याचा राग धरून सोमवारी (दि.१४) पहाटे दीड वाजता उद्धव कोंडीराम मरकड याने दारुच्या नशेत बाळासाहेब मरकड यांच्या घरात घुसून पिस्तूलने बाळासाहेब मरकड यांच्यावर गोळी झाडली. पण त्यात ते बचावले.

आले जीवावर, बेतले कुत्रीवर

बाळासाहेब झोपलेले असताना उद्धव मरकड याने गोळी झाडली. पण त्यावेळी त्यांच्या पायथ्याला बसलेली कुत्री उभी राहली आणि बाळासाहेब यांच्यावर झाडलेली गोळी कुत्रीला लागली. गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने सर्व लोक जागे झाले. त्यांनी पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली व उद्धव यास पोलिसांच्या ताब्यात दिले.

पुतणीच्या पिस्तूलमधून गोळीबार

गोळीबार करण्यात आलेले पिस्तूल बाळासाहेब यांची पुतणी पुष्पा नीलेश पानसरे व नीलेश अशोक पानसरे (रा. भगवती कोल्हार) यांच्या नावावर असून त्यांनी हे पिस्तूल उद्धव यास वापरायला दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे करत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड