कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून नियमांची कडक अंमलबजावणी सुरू आहे. रविवारी तोफखाना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी पथकासह गस्त घालत नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली. यावेळी मास्क न घालणारे, तसेच एका ठिकाणी बसून भाजीपाला विकणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. या पथकाने दिवसभरात ३५ जणांवर कारवाई करत २१ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दरम्यान, कॉटेज कॉर्नर परिसरात एका ठिकाणी घराच्या कंपाउंडचे काम सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी काही मजूर त्या ठिकाणी काम करत होते. कडक निर्बंध लागू असल्याने, अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार व कामास सध्या बंदी आहे. त्यामुळे पोलिसांनी सदर जागा मालकावर दंडात्मक कारवाई केली.
.....................
आधी प्रबोधन, नंतर दंड
शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक विकास देवरे यांनी रविवारी दिवसभर पथकासह शहरात विविध ठिकाणी गस्त घालत विनाकारण बाहेर फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी निरीक्षक देवरे यांनी विनाकारण फिरणाऱ्यांचे प्रथम प्रबोधन केले. कोरोनाचा संसर्ग किती घातक आहे. या संदर्भात त्यांना समज दिली. त्यानंतर, प्रत्येकाला पाचशे रुपये दंड ठोठावला.
........