शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपुरातील फरार व्यापाऱ्यांचा शोध घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST

मनोज पाटील : पीडित शेतकऱ्यांनी मांडली कैफियत लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर : येथील शेतकऱ्यांचे एक कोटी रुपयांचे भुसाराचे पैसे ...

मनोज पाटील : पीडित शेतकऱ्यांनी मांडली कैफियत

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : येथील शेतकऱ्यांचे एक कोटी रुपयांचे भुसाराचे पैसे बुडवून पळ काढणाऱ्या चार व्यापाऱ्यांचा तातडीने शोध घेण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी दिले. याप्रकरणी पोलीस तपासात दिरंगाई केल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी श्रीरामपूर पोलिसांना दिला आहे.

व्यापारी हिरण यांच्या हत्येच्या तपासाची माहिती देण्यासाठी शनिवारी पाटील यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी तालुक्यातील माळवाडगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी पाटील यांची भेट घेतली.

याप्रकरणी रमेश रामलाल मुथा, चंदन रमेश मुथा, गणेश रामलाल मुथा या व्यापाऱ्यांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची एक कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. मात्र, ८ फेब्रुवारीपासून हे आरोपी कुटुंबासह फरार झाले आहेत. पोलिसांना अद्याप त्यांचा शोध घेण्यात यश आलेले नाही, अशी कैफियत शेतकऱ्यांनी मनोज पाटील यांच्यासमोर मांडली.

या प्रकरणाची पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तातडीने शोध कार्य हाती घेण्याचे आदेश यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना दिले. याप्रकरणी कारवाईस टाळाटाळ झाली तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

व्यापारी मुथा बंधू यांनी एका मोठ्या पतसंस्थेकडून कर्ज उचलले होते. त्यांचे ८ हजार भुसाराचे पोते पतसंस्थेकडे तारण आहेत. मुथा यांचे माळवाडगाव येथे मोठे किराणा दुकान होते. भुसाराचे मोठे गोदामही त्यांनी बांधले होते. ते सर्व सोडून व्यापाऱ्यांनी धूम ठोकली आहे.

...

पावत्यावरुन गुन्हा दाखल

पोलिसांनी जळगाव, पालघर, मुंबई, नवसारी, बडोदा येथे व्यापारी मुथा यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मुथा यांनी शेतकऱ्यांना दिलेले धनादेश तसेच भुसाराच्या पावत्यांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक शेतकरी पुराव्याअभावी गुन्हा दाखल करण्यासाठी अद्याप पुढे आलेले नाहीत. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मसूद खान याप्रकरणी तपास करीत आहेत.