शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर केंद्रप्रमुखांच्या भरतीला मुहूर्त, नगरमधून भरणार १२३ पदे

By चंद्रकांत शेळके | Updated: June 7, 2023 19:01 IST

चंद्रकांत शेळके  अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांना प्रतिक्षा असलेल्या केंद्रप्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षेतून भरली जाणार आहेत. १५ जूनपर्यंत ...

चंद्रकांत शेळके अहमदनगर : गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांना प्रतिक्षा असलेल्या केंद्रप्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षेतून भरली जाणार आहेत. १५ जूनपर्यंत यासाठी शिक्षक ॲानलाईन अर्ज करू शकणार असून जूनच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा होणार आहे.

केंद्रप्रमुखाचे पद सरळसेवा भरतीतून, तसेच शिक्षकांमधून पदोन्नतीने व स्पर्धा परीक्षेद्वारे भरले जाते. पदोन्नतीने जिल्ह्यातील सर्व पदे भरलेली आहेत. मात्र, अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षेतून भरायची पदे रिक्त होती. ती आता भरली जाणार आहेत. महाराष्ट्र परीक्षा परिषदेने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात २३८४ पदे भरायची आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ६ ते १५ जूनपर्यंत आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात यासाठी परीक्षा होणार आहे. ती तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.कोण करू शकतो अर्जफक्त संबंधित जिल्हा परिषदेचे पात्र शिक्षक या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. न.प.,न. पा.,म.न.पा., खासगी संस्थांमधील शिक्षक अर्ज करण्यास पात्र नाहीत. संबंधित शिक्षक ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, तसेच जिल्हा परिषदेवर तीन वर्षे सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) झालेली हवी.नगर जिल्ह्यात १२३ पदे भरणारया परीक्षेतून राज्यात २३८४ पदे भरली जाणार आहेत. त्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यात १५४, रत्नागिरीत १२५, तर नगर जिल्ह्यात १२३ पदे भरली जाणार आहेत.जिल्ह्यात ७० टक्के पदे रिक्तजिल्ह्यात केंद्रप्रमुखांची तब्बल ७० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकाच केंद्रप्रमुखाला इतर केंद्रांचाही अतिरिक्त भार सांभाळावा लागत आहे. जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची अडीचशे पदे मंजूर आहेत. शासन निर्णयानुसार एकूण पदांपैकी ४० टक्के पदे सरळसेवेतून, ३० टक्के स्पर्धा परीक्षेतून, तर उर्वरित ३० टक्के पदे पदोन्नतीने भरली जातात. जिल्ह्यात पदोन्नतीने सर्व म्हणजे ७६ पदे भरलेली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तेवढीच पदे भरलेली होती. सरळसेवेची ९८, तर स्पर्धा परीक्षेतून भरायची ७४ पदे रिक्तच होती. पैकी स्पर्धा परीक्षेतून आता १२३ पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे बराचसा अनुशेष भरून निघणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTeacherशिक्षक