शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आढळाधरणातून रब्बी आवर्तन सुटले : सुरक्षेच्या कारणास्तव कमी दाबाने प्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 20:09 IST

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी दुपारी अकोले तालुक्यातील आढळा धरणातून रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन जलसंपदा विभागाने सोडले.

गणोरे : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी दुपारी अकोले तालुक्यातील आढळा धरणातून रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन जलसंपदा विभागाने सोडले.मात्र, धरणाच्या लाभक्षेत्रात दोन्ही कालव्यांतून यंदाचा पाण्याचा पहिलाच प्रवाह कालव्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव कमी दाबाने सोडण्यात आला आहे. कालव्यांतील अडथळ्यांची भीती असल्याने, रात्रीच्या वेळी पाण्याचा प्रवास सिंचन यंत्रणेसाठी चिंताजनक असल्याचे समजते. नेहमी पहाटेच्या वेळी पाणी सोडून दिवसभरात पाण्याच्या प्रवाहातील तुंबलेल्या अडथळ्यांना दूर करता येते. मात्र, यंदा अद्याप कालव्यांतील स्वच्छता पुरेशी झालेली नाही. आवर्तन सोडण्याबाबत आजही द्विधा मनस्थितीत असलेल्या अधिका-यांनी अखेर दुपारी दोन्ही कालव्यांत प्रत्येकी २० क्युसेकने पाणी सोडले आहे. सोमवार १५ जानेवारीस पहाटे हे आवर्तन जाहीर केल्याप्रमाणे पुरेशा तयारीअभावी सोडताच आले नाही. त्यामुळे उशिराने मंगळवारी दुपारी सोडण्यात आले आहे.

पहिल्यांदाच रब्बीचे आवर्तन एवढे रखडले

रब्बी हंगाम सुरू होऊनही तीन महिने उलटले. नुकतेच कालव्यांमधील गवत व झाडा - झुडपांच्या सफाईचे काम घाईघाईत करण्यात आले आहे. धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या उशिरापर्यंत रब्बी हंगामाच्या आवर्तनाचे नियोजन रखडण्याची वेळ आली आहे. एक हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या धरणात ९७२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील उपयुक्त पाणी साठ्यातून रब्बी हंगामातील अन्नधान्य, चारापिके,उभ्या भुसार पिकांसाठी पाणी देण्यात येणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले