शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

अकोलेतील सौदर्यांच्या प्रेमात पडताहेत चित्रपट निर्माते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 15:33 IST

मराठी चित्रपटांचे ‘बजेट’ लक्षात घेऊन ग्रामीण जीवनावर आधारित चित्रपटांच्या निर्मितीकडे सध्या कल वाढला आहे. ‘राणू’चं नुकतच चित्रीकरण पूर्ण होऊन तो प्रदर्शित झाला. यापूर्वी गणवेश, योध्दा या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण अकोले शहर व तालुक्याच्या मातीत झाले.

हेमंत आवारी । अकोले : मराठी चित्रपटांचे ‘बजेट’ लक्षात घेऊन ग्रामीण जीवनावर आधारित चित्रपटांच्या निर्मितीकडे सध्या कल वाढला आहे. ‘राणू’चं नुकतच चित्रीकरण पूर्ण होऊन तो प्रदर्शित झाला. यापूर्वी गणवेश, योध्दा या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण अकोले शहर व तालुक्याच्या मातीत झाले. त्यामुळे स्थानिक बाल व ज्येष्ठ कलाकारांना चित्रपटातून चकमण्याची संधीही मिळाली. ‘राणू’तही तालुक्यातील दहा-बारा कलावंत दिसताहेत.निसर्गाचं लेणे लाभलेल्या या आदिवासी बहुल तालुक्यात चित्रपटाच्या शुटींगसाठी भरपूर ठिकाणे आहेत. टिपीकल खेडी, भंडारदरा जलाशय परिसर, तालुक्यात असलेले जवळपास २६ गड किल्ले, अगस्तीसह सिध्देश्वरसारखी पौराणिक मंदिरे, अगस्ती-मॉडर्न हायस्कूल, अभिनव स्कूल, बसस्थानक परिसर, अगस्तीची महाशिवरात्र यात्रा, गावोगावाच्या जत्रा, तांभोळ शाळा, हिरवाकंच प्रवरानदी काठ, ऊस बागायती शेती, आदिवासी भागातील तिन्ही ऋतूत वेगळेपण दडलेलं संघर्षमय जीवन अशा अनेक गोष्टी चित्रपट चित्रीकरणासाठी याभागात सहज उपलब्ध आहेत. या भागातील लोक हौशी आहेत. चित्रपट निर्मात्यास आढेवेढे न घेता आपल्या मालकीच्या जागा उपलब्ध करुन देतात. शाळा कॉलेज व देवस्थानसारख्या संस्थाही सहकार्य करतात. कमी मोबदल्यात स्थानिक कलाकार मिळतात. काही हौशी कलाकार संधी म्हणून विनामोबदला चित्रपटात काम करतात. या सर्व बाजूचा विचार करुन मराठी चित्रपट निर्मात्यांनी अकोलेकडे मोर्चा वळविल्याचे चित्र आहे. याच बरोबर धुमाळवाडी व नवलेवाडी येथील तरुण चित्रपट निर्माते क्षेत्रात असल्याने शुटींगसाठी अकोलेभागाला प्राधान्य दिले जात  आहे. योध्दा व सरगम चित्रपटाचा निर्माता मच्छिंद्र धुमाळ, ‘गैर’  चित्रपटाचा निर्माता संतोष नवले अकोलेच्या मातीतील असून रवींद्र नवले, प्रदीप नवले, नाना रसाळ अशी काही मंडळी चित्रपटांतून पडद्यावर नेहमी दिसतात. अकोलेतील कलाकार पडद्यावर ‘राणू’ चित्रपटाचे बहुतांशी शुटींग अकोले परिसरात  झाले आहे. संदीप रसाळ, राजू अत्तार, विलास गोसावी, सुभाष खरबस, डॉ.उल्हास कुलकर्णी, इंद्रभान कोल्हाळ, सादिक शेख, असमा शेख, सतिश मालवणकर, अक्षय भिंगारदिवे,  अथर्व रसाळ, रामदास  धुमाळ या हौशी कलाकारांना ‘राणू’ चित्रपटात संधी मिळाली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेcinemaसिनेमा